Home गडचिरोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे...

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दुपट्टा देऊन केले पक्षात स्वागत.

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0014.jpg

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दुपट्टा देऊन केले पक्षात स्वागत.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- भारताचे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांनी आपल्या पदाचा व पक्षाचा त्याग करत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तरारे म्ह्नाले जिल्हाध्यक्ष म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीची धेय्य, धोरणे चांगल्या रीतीने राबविले मात्र तिथे नेहमी अन्याय होत असल्याचे मला दिसले. पक्षाची स्थापना बहुजनांच्या कल्याणसाठी आहे असे वाटले परंतु हा पक्ष नेहमीच भाजप ची बी टीम म्हणून काम करत असल्याचे दिसले. सोबतच पक्षात अंतर्गत राजकारण मोठ्या संख्येने आहे. वंचित कडून नेहमी ओबीसी समाजाचा वापर करून अंतर्गत राजकारण साकारले जाते. हे तत्व माझ्या व्यक्तीक जीवनात बसत नसल्याने मी या पक्षाचा व जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांना वंचित ची विचारधारा जनसामान्यांसाठी अहितकारी वाटल्याने त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला आहे त्या बद्दल त्यांचे हार्दिक स्वागत आहे. येनाऱ्या काळात अनेक वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील कॉंग्रेस पक्ष्यात प्रवेश करतील असा विश्वास जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, संयम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनु.जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, राकेश रत्नावार, महासचिव घनश्याम वाढई, सदाशिव कोडापे, रुपचंद उंदिरवाडे, हरबाजी मोरे, मुरलीधर मंग, सुभाष धाईत, बाबुराव गडसूलवार, अब्दुल पंजवाणी, अविनाश बांबोळे, आशिष कामडी, जावेद खान, रवी सहारे, भास्कर बांबोळे, सुधीर बांबोळे, समया पशूला , जितेंद्र मूनघाटे, वसंत राऊत, भय्याजी मुद्दमवार, तौफिक शेख, कल्पना नंदेशवर,आशा मेश्राम, विद्या कांबळे, मयुर गावतुरे सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी मिळून दुर्योधन तरारे यांचा काँग्रेस पक्षाच्या स्वागत केले.

Previous articleभारताचे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी हेच खरे आधुनिक भारताचे शिल्पकार— महेंद्र ब्राम्हणवाडे.
Next articleअखेर त्या युवकाचे प्रेत वैनगंगेच्या नदी पाञात कुजलेल्या अवस्थेत आढळले।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here