Home नंदुरबार स्वातंत्र्य दिनानिमित्त शहादा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर...

स्वातंत्र्य दिनानिमित्त शहादा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर संपन्न

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0150.jpg

स्वातंत्र्य दिनानिमित्त शहादा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर संपन्न

नंदुरबार ब्युरो चीफ सागर (गणेश) कांदळकर :       15 आँगस्ट 2022 : युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन शाखा शहादा च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील मानव एकता दिवसाच्या निमित्ताने अन्नपूर्णा मँरेज लाँन्सं, डोगरगांव रोड, शहादा येथे सकाळी 9.00 ते 4.00 यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन मा. श्री. हिरालाल पाटील जी (झोनल ईंचार्ज, धुळे झोन 36-बी) यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले यावेळी .
स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे.
यावेळी एकुण 125 रक्तयुनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी शासकीय रुग्णालयात नंदुरबार चे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते।
रक्तदान शिबीर नंतर मुक्ती पर्व दिवस सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आतापर्यंत संपूर्ण भारतात 265 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये सुमारे 40000 ते 50000 युनिट रक्त संकलित होईल अशी अपेक्षा आहे.
रक्तदान शिबिरांच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आलेले कोविड -19 चे निर्देश लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली गेली.
या विशाल रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार , पिण्याच्या पाण्याची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी संत निरंकारी मिशन शहादा शाखेचे मुखी मा. श्री. मोहनलाल आहुजा जी, सेवादल संचालक मा. श्री. संजय निकुंभे, मा. श्री. सन्नी जिसेजा जी यांच्या सोबत साध संगत ,SNCF सदस्य महेंद्र गिरासे,लालचंद पाटील व सेवादल अधिकारी सह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here