Home परभणी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) ता...

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) ता जिंतूर येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा 

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0151.jpg

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) ता जिंतूर येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

विष्णु डाखुरे कोरवाडीकर (तालुका प्रतिनिधी )

आज दि.15ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी भांबळे येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात पार पडला . सर्वप्रथम गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली . प्रभातफेरी नंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष्याच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला . ध्वजारोहन प्राचार्य श्री जी .आर . पवार सर यांच्या हस्ते संपन्न झाले .कार्यकमाचे प्रास्तावीक श्री पवार व्ही पी यांनी केले . प्रास्ताविकानंतर कुमारी रेणूका वाकळे व प्रणीता आलाटे यांनी आपल्या मधूर देशभक्तीपर गीताने स्वागत केले .प्रथमतः प्रतिमापूजन करण्यात आले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजनही या प्रसंगी करण्यात आले .यावेळी श्री ताठे एस एम , ठोके बी एस , कापुरे एस जे , खोब्रागडे के जे , पडघान टी आर , चोपडे राजू, चोपडे गजानन , धुमाळ जे डी , डी एन राठोड , कुरई एन आर यांची उपस्थित होती .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जी आर पवार सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. या प्रसंगी पंचक्रोशीतील पदाधीकारी , ग्रामपंचायत सदस्य , जि प शाळेचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी , प्रतिष्ठीत गावकरी मंडळी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन घुगे एम डी यांनी केले तर श्री मुळे डी बी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here