Home बुलढाणा शासकीय तलाठी वर्गाकडुन आपल्या कार्यालयीन ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्याचा विसर

शासकीय तलाठी वर्गाकडुन आपल्या कार्यालयीन ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्याचा विसर

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0130.jpg

शासकीय तलाठी वर्गाकडुन आपल्या कार्यालयीन ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्याचा विसर

हर घर तिरंग्याचे नियोजन संग्रामपूर तालुक्यातील काही तलाठी वर्गांकडून पार पाडल्या गेले नाही
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

बीडीओ तसेच तहसीलदारांचे झेंडा लावण्याचे नागरिकांना आव्हान असुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना झेंडा लावण्याचा विसर असल्याचे चित्र
संग्रामपूर तालुक्यातील पळसोडा,एकलारा,वरवट बकाल ,वानखेड, यांच्या कार्यालयीन ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्यात आलेला नाही दिनांक शासनाच्या 13 ऑगेस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला दुपारी 3 वाजले तरी पन तलाठ्यांच्या कार्यालयांमध्ये ब्यूरो स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज पाहणी केली असता बहुतांश कार्यालयांमध्ये ग्रामसेवक तसेच पटवाऱ्यांना,कोतवाल यांना झेंडा लावण्याचा विसर पडल्याचे दिसले आहे.

एकीकडे संग्रामपूर तहसील कार्यालयाचे बीडीओ,तहसीलदार यांनी दि. 29 जुलै ला अमृत महोत्सवाच्या 1 ते 17 ऑगस्ट च्या कार्यप्रणालीची आढावा बैठक घेऊन सभा आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टला तालुक्यातील जनतेला हर घर तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्व अधिकारी यांना आदेश देऊन हर घर तिरंगा आपल्या तालुक्यामधील अंमलबाजावणीला वाव दिला आहे याकरिता संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आदेश तसेच माहिती दिली असून सुद्धा महसूल चेच कर्मचारी तहसीलदारांच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे तसेच केराची टोपली दाखवत असल्याचे दृश्य आज 15 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत या कार्यालयांमध्ये तिरंगी झेंडा कुठेही लावल्याचे दिसून आले नसल्याने या महसूल अधिकारी कोतवाल यांचा विसर भोळेपणा यानिमित्ताने दिसून आला आहे.
या मधील काही तलाठ्यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता,आमचे कार्यालय भाड्याने आहे तर काहींनी आमचे लक्ष नाही,आम्ही विसरलो,तसेच काही ग्रामसेवक सुट्टीवर आहे,काही कोतवाल यांना संपर्क केला असता आमच्या साहेबनचा नंबर बंद आहे असे उत्तरे मिळाली..
यावर तहसीलदार साहेब काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here