Home बीड दोन दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक; एक जण जागीच ठार

दोन दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक; एक जण जागीच ठार

112

आशाताई बच्छाव

IMG_20240219_045708.jpg

दोन दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक; एक जण जागीच ठार

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/वडवणी दि १८  दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला आहे. तर एक जनाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुसरा फाट्या जवळ घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वडवणी होऊन तेलगावकडे जाणारी स्प्लेंडर गाडी एम एच ४४ एम ३१ ९३ व तेलगाव कडून वडवणीकडे येत असलेली पल्सर गाडी एम एच ४४ व्ही ५५९४ दुचाकींची समोरासमोर जबरदस्त धडक बसली असून यात दोन्ही गाड्या चालकांना मार लागला होता. तर स्प्लेंडर वरील गाडी चालक टोकेवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नाव समजू शकले नाही वय अंदाजे ३० वर्षे हे जागीच ठार झाले आहेत. तर पल्सर या दुचाकीचा चालक व पुसरा फाट्यावरील एक युवक विकास शहादेव झोडगे वय २७ वर्षे याला बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु गंभीर मार लागला असल्याने त्यांचा देखील रात्री ११.०० वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सदरील परिस्थिती पाहता गाड्यांचा चक्काचूर झाल्याचे दिसून आले आहे. या अपघातातील दोन्ही गाड्या वडवणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.

Previous articleमुली शिकल्या नसत्या तर……!
Next articleमिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक मध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ चार तरुणाचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.