Home सामाजिक नरवीर तान्हाजी मालूसरे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

नरवीर तान्हाजी मालूसरे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

292
0

4.2.21

नरवीर तान्हाजी मालूसरे यांना
मानाचा मुजरा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

युवा मराठा न्युज प्रतिनिधी अरुण कुंभार रायगड 
नरवीर तान्हाजी मालूसरे

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रखर बुद्धिमत्ता ,अलौकिक शौर्य, मुत्सद्देगिरी, चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी युक्त असलेले शिवराय त्यांनी आपले सर्वस्व मावळ्यांना अर्पण केले ,जीवावर बेतणारे धाडस करून आग्र्याहून सुटका, अफजलखान वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्तेखानावर छापा अशा अनेक प्रसंगी जीवाची पर्वा केली नाही ,मावळ खोऱ्यात सुरू असलेला स्वराज्यसंग्राम समुद्रकिनाऱ्या पर्यंत नेला. नेतृत्व चांगले नीतिमान असेल तर प्रजाही चांगले असते हा आदर्श संपूर्ण जगात सर्वप्रथम शिवरायांनी निर्माण केला म्हणूनच शिवरायांना विश्ववंदनीय कल्याणकारी राजा असे म्हणतात. शिवरायांनी मावळ खोर्‍यातील मावळ्यांच्या मनामनात स्वराज्याची ज्वाला प्रचलीत केली म्हणूनच महाराजांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मावळे निर्माण झाले, हौसेने मरण ओढवून घेणारा वीर मावळा फक्त शिवरायांच्या राज्यात जन्मतो, कितीतरी ज्ञात अज्ञात मावळे या स्वराज्याचे शिलेदार आहेत अशा दिव्य बलिदानाच्या गाथा आज क्वचितच पाहायला मिळतील, कुणासाठी या मावळ्यांनी स्वतःचा जीव वारेमोल उधळला, या महाराष्ट्राचे सार्वभौमत्व चिरंतन राखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या पायघड्या स्वराज्यासाठी घातल्या.. जगायचं ते या मातीसाठी आणि मरायचं ते या मातीसाठीच ही भावना त्यांच्या मनात रुजली होती….. बलिदानातून स्वराज्य निर्मिती साठी प्रत्येकाने हातभार लावलेला होता. असेच एक स्वराज्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे,
स्वराज्य भक्तीची भगवी ज्वाळा उराशी कवटाळून मावळे लढले आणि स्वराज्याची निर्मिती झाली….. कर्तव्यनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा म्हणजे नेमके काय? हे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळते, स्वराज्यासाठी स्वतःचा जीव वारेमोल उधळणारे मावळे आपल्याला पहायला मिळतात ते स्वराज्य मध्येचं… स्वतःचं मरण समोर दिसत असतानाही तळहातावर शीर घेऊन लढणारे मावळे आपल्याला पाहायला मिळतात ते स्वराज्यात हे मात्र त्रिवार सत्य आहे,” आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे” असे म्हणणारे तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास सांगितला आहे पण काही अपरिचित गोष्टी आहेत त्या ज्ञात होणे गरजेचे आहे. आपण सारे म्हणताना सहज म्हणतो तान्हाजी मालुसरे उमरठचे, पण खरं तर तान्हाजी मालुसरे हे गोडवलीचे गोडवली हे त्यांचे जन्मगाव, तपनेश्वर शंभू महादेवाच्या कृपेने काळोजी रावांना झालेलं पुत्ररत्न म्हणून त्यांचे नाव तान्हा ठेवले,तान्हाजी.. त्यांचे नाव तान्हाजी आहे असा उल्लेख पत्रामध्ये येतो, गोडवली मध्ये यवनांच्या हल्ल्यामध्ये तान्हाजींचे वडील काळोजी आणि काका भवरजी हे धारातीर्थी पडल्यानंतर त्यांचे मामा म्हणजे रायाजी कोंडाजी शेलार यांनी आपली बहीण आणि आणि भाचे तान्हाजी व सुर्याजी यांना जवळच कुडपण या गावी आणले पण तेथेही ते सुरक्षित नव्हते त्यामुळे या दोघांना घेऊन पार्वतीबाई व शेलार मामा उमरठ या गावी जो मोरझत चा धबधबा आहे तेथील बाजूच्या गुहेत आठ दिवस राहिले याच वेळी उमरठ गावचे कळंबे पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात येतात चौकशी करून त्यांनी त्यांनी त्यांना राहायला जागा आणि कसायला जमीन दिली आणि मग याच उमरठच्या लाल मातीत
तान्हाजी मालुसरे लहानाचे मोठे होत होता,रायाची कोंडाजी शेलार म्हणजे शेलार मामा त्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण देऊ लागले, त्यांना व सूर्याजी यांना लाल मातीतील कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा खेळणे, घोडेस्वारी करणे, गोफण गुंडा फेकणे असे सगळे प्रशिक्षण शेलार मामा ने दिले अगदी याच वेळेला राजगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब शिवरायांना स्वराज्याचे धडे देत होत्या. शेलार मामा आपल्या दोन्ही भाच्यांना घेवून राजगडी दाखल झाले आणि स्वतःही सामील झाले. खरंतर रायाजी कोंडाजी शेलार हे मूळचे कुडपण गावचे, पण स्वराज्यात मात्र ते स्वराज्याचे शेलारमामा म्हणून प्रसिद्ध आहेत.
स्वराज्यकार्याला सुरुवात झाली. रायरेश्वराच्या मंदिरी रक्ताच्या अभिषेकाने स्वराज्याची शपथ घेण्यात आली ही शपथ घेताना शिवरायांसोबत होते तान्हाजी मालुसरे, इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत तान्हाजी मालुसरे शिवरायांसोबत होते,तोरणा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले.. शिवाजी राजांच्या प्रत्येक मोहिमेत तान्हाजी हे अग्रस्थानी असत, सर्वांशी चर्चा करून विचारविनिमय करून शौर्याने मोहीम फत्ते करण्यात ते हुशार होते, तसेच ते बुद्धीने चाणाक्ष होते.व प्रतापगडच्या मोहिमेत त्यांनी विशेष सावधगिरी बाळगत शौर्य गाजवले, राजाने त्यांच्याकडे पायदळाची जबाबदारी दिली होती.तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, कोंढाणा इत्यादी मोक्याचा ठिकाणचे किल्ले जिंकून राजांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली होती, सूर्याजी तान्हाजी,येसाजी,बाजी, सर्जेराव
अढळराव अशा निधडया छातीच्या मावळ्यांच्या साक्षीने स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच होती. जावळीच्या मोर्यंचे पारिपत्य करून महाराजांनी रायगड सर केला.
तान्हाजींना कोकणची खडानखडा माहिती होती ,कोकणातील घाट माथे, डोंगर दरी, किनारपट्टी याची संपूर्ण माहिती होती आणि म्हणूनच त्यांना कोंकणची प्रांताची सुभेदारी देण्यात आली. त्यामुळे कोकणची परिस्थिती बदलली ,तळकोकण काबीज झाले. तान्हाजी मालुसरे स्वामीनिष्ठेने कोकण प्रांताचा कारभार पाहत होते. सुभानमंगळ किल्ला घेण्यासाठी तान्हाजी मालुसरे महाराजांसोबत होते, त्यांनी बाळाजी हैबतराव याला पळता भुई थोडी केली होती. तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याने सर्वांचे डोळे दिपून गेले होते ,त्यांच्या रूपाने महाराजांना अनमोल हिरा सापडला होता. त्यानंतर महाराजांनी लोहगड-विसापूर, प्रबळगड, सरसगड ,कल्याण-भिवंडी ,राजमाची अशा मोहिमा महाराजांनी हाती घेतल्या आणि यामध्ये तान्हाजी मालुसरे यांचा सहभाग होता, सावलीसारखे हे महाराजांसोबत होते, प्रतापगडाची लढाई जिंकल्यानंतर महाराज पन्हाळगडावर स्वारी केली. यानंतर औरंगजेबाने कारतलब खानाला कोकण स्वारीवर पाठवले. कारतलबखान आपली फौज घेऊन लोहगडापासून तुंगारण्यात आला. अत्यंत घनदाट जंगल असलेला जंगल असलेल्या आणि अगदी सैन्य उंबरखिंडीत आल्यानंतर नेताजी पालकर आणि तान्हाजी मालुसरे यांनी खानाच्या सैन्याची अक्षरश दाणादाण उडवली,लढाई कोणतीही असो तान्हाजी मालुसरे ती निधड्या छातीने लढायचे म्हणूनच त्यांना शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हटले जायचे.कोकणातील स्वारीच्या वेळी घडलेला प्रसंग आपल्या सर्वांना माहितीच आहे .पिलाजीराव निलकंठ सरनाईक याला “अरे नामर्दासारखा पळतोस काय? लढाई कशी करतात ते बघ” हे तर सर्वांना माहितीच आहे. शाहिस्तेखानावर छापा या प्रसंगांमध्ये शिवरायांनी तान्हाजी मालुसरेना कात्रज घाटात जाण्याची आज्ञा केली आणि तेथे गेल्यावर लग्नाचे वराड तयार ठेवायला सांगितले आणि आज्ञा मिळताच पुण्याकडे जायचे ठरले .सोंग वठवण्यात तान्हाजी मालुसरे यांचा हातखंडा होता. पुण्यामध्ये लाल महालाकडे खरोखरच लग्न वर्‍हाडी मंडळी वाजत-गाजत येत असल्याचे चित्र उभे केले होते .असे कितीतरी प्रसंग जे आपल्याला माहितीच नाही. ज्या वेळेला सुरतेवर छापा टाकायचं ठरलं तेव्हा .तान्हाजी मालुसरेनी देवीच्या देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतलं आणि महाराज कोणत्या नवीन मोहिमेची घोषणा करतात त्याची वाट
होते त्यांचा सहभाग त्यामध्ये फार मोठा होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाहिजे जेणेकरून डच आणि पोर्तुगीज यांच्यावर नजर ठेवता येईल त्यांच्या म्हणूनच जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला . जलदुर्ग बांधण्याचे ठरवले तेव्हा शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची संपूर्ण जबाबदारीही तान्हाजी मालुसरे यांच्यावर टाकली? तान्हाजी मालुसरे यांच्या कल्पक बुद्धी याची साक्ष देत आजही सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे. त्याच्या जोडीला कुलाबा, खांदेरी, सुवर्णदुर्ग ,विजयदुर्ग असे कितीतरी जलदुर्ग शिवरायांनी उभे केले पुरंदरचा तह सर्वांना माहितीच आहे या तहात गेलेले बाकीचे इतर सर्व किल्ले मिळवण्यात महाराजांनी यश आलं. पण कोंढाणा मात्र अजूनही यवनांच्या ताब्यात होता आणि तो मिळवण्यासाठी महाराज मोहिमेची आखणी करत होते आणि याच वेळेला रायबाच्या लग्नाचे निमंत्रण पत्रिका द्यायला तान्हा जी मालुसरे राजगडावरती गेले होते महाराज म्हणाले की कोंढाण्याच्या मोहीमेवर जायचा विचार करतोय तेव्हा तान्हाजी गरजले,”महाराज आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे” इथून पुढे सारा इतिहास घडत गेला. घोरपडे बंधू ,मध्यरात्रीच्या सुमारास केलेला हल्ला,तुटलेली ढाल….शेलार मामा यांनी केलेला अखेरचा वार…..गवताची गंजी पेटवून महाराजांना वर्दी देण्यात आली पण पण इकडे काय घडले होते….. कोंढाण्याची माती तान्हाजी मालुसरे यांच्या रक्ताने भिजलेली होती. तो सह्याद्रीचा कडा ढसाढसा रडत होता त्यांच्या शौर्याला सलाम करत होता. सारेजण राजगडाच्या दिशेने निघाले, महाराज वाटच पाहत होते, पद्मावती माचीवर पालखी आली भोयानी पडदा बाजूला केला आणि रक्त माखला तानाजींचा देह पाहता महाराज म्हणाले अरेरे माझा तान्हा गेला ,माझा उजवा हात गेला ,गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणत शिवाजी महाराजांनी आपल्या गळ्यातील समुद्र कवड्याची माळ काढली आणि ती तान्हाजी मालुसरे यांच्या देहावर ठेवली.. त्यानंतर उमरठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उमरठ येथे आहे ती त्यांची अग्निसमाधी,सिंहगडावर आहे ती त्यांची देह समाधी. गोडवली ही त्यांची जन्मभूमी, उमरठ ही त्यांची कर्मभूमी आणि कोंढाणा ही त्यांची शौर्य भूमी. त्यानंतर महाराजांनी रायबाचं लग्न लावून दिलं आणि पारगड किल्ल्याची किल्लेदारी दिली आणि चंद्रसूर्य असेपर्यंत हा गड जागता ठेवा असे सांगितले. त्यानंतर मालुसरे घराण्याचे आठव्या पिढीपर्यंत चे वंशज गडावरच होते नववी ,दहावी आणि अकरावी पिढी, अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे हे बेळगाव येथे स्थायिक झाले आणि त्यांचे चिरंजीव थेट बारावी वंशज शिवराज मालुसरे हे महाड येथे स्थायिक झाले .रायबा मालुसरे हे थेट तेरावे वंशज महाड येथे असतात. शिवराज मालुसरेंची पत्नी म्हणून आणि मालुसरे घराण्याची सून म्हणून हा वारसा जपत आहे .साडेतीनशे वर्षांपूर्वीची कवड्याची माळ आज आमच्याकडे आहे ,पारगड ची सनद आणि जवळजवळ दोनशे पत्रे आहेत इतिहासाचा एक छान वारसा मिळाला आहे तो प्रामाणिकपणे जपत आहे…. इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे आणि सासरे बाळकृष्ण मालूसरे यांच्या प्रेरणेने हे शिवधनुष्य पेलण्याच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत…हे महत्वाचे.

डॉ.शीतल शिवराज मालूसरे
महाड-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here