Home विदर्भ संपादक राजेश कोचर यांचे वर न.पा. हिंगणघाट मध्ये हमला

संपादक राजेश कोचर यांचे वर न.पा. हिंगणघाट मध्ये हमला

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0032.jpg

संपादक राजेश कोचर यांचे वर न.पा. हिंगणघाट मध्ये हमला

हिंगणघाट :- स्थानिक साप्ताहिक लोकचेतना चे संपादक तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष राजेश अमरचंद कोचर यांचेवर नगर पालिका हिंगणघाट येथील करविभागात ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथ राऊत, संत खंडोबा वार्ड यांनी वादावाद करुन हमला केला, यामध्ये राजेश कोचर यांना जबर दुखापत झालेली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता राजेश कोचर हे नगरपालिका येथे आपले कार्यालयीन कामानिमित्य दुपारी 12:00 वाजतेचे दरम्यान गेले असता आरोपी ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत राऊत यांनी कोचर यांना साप्ताहिक लोकचेतना पेपर मागितला तेव्हां त्यांनी पेपरची तारीख घेऊन माझे कार्यालयात ये मी तुला पेपर काढून देतो असा सांगत असतांनाच राऊत यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी मारहाण करीत संपादक राजेश कोचर यांना जबर मारहाण केली. यासंदर्भात हिंगणघाट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भांदवी 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कोचर यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले.
पत्रकार संघ हिंगणघाट चे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक, प्रदीप आर्य, सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, मुकेश चौधरी, रवी येनोरकर, सुरेंद्र बोरकर, केवलदास ढाले, मोहम्मद मलक नईम, शुभम कोचर, मोहसिन खान, आदी पत्रकारांनी ह्या घटनेचा निषेध नोंदवित पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी कायद्यान्वेय कठोर कारवाई करीत पत्रकार मंडळीवर असे हमले परत करण्याची हिम्मत कुणाची होणार नाही असा वचक पोलीसांनी करावा.

Previous articleनांदगाव पोलीस स्टेशनचा हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात रक्षक च बनले भक्षक
Next articleचंद्रभागेकाठी नवीन घाट, पार्किंगचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी शंभरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here