• Home
  • मुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सावळी बेनाळ रस्त्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांची कसरत…
मुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड मुक्रमाबाद परिसरातील मौजे सावळी बेनाळ रस्त्यावर पूल नसल्या कारणाने नागरिकांना व प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीच्या जोरदार पावसाने सावळी येथील नदीला पूर येऊन पूल वाहून गेल्याने बऱ्याच दिवसापासून या गावाचा संपर्क तुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम अद्याप झालेले नाही त्यामुळे नागरिकांची व भाविकांची गैरसोय होत आहे. अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी. असे नागरिकातून बोलले जात आहे. बऱ्याचदा या पाण्यातून जाते वेळेस अपघात पण घडले आहेत प्रसिद्ध असलेले मशनेर दैवत येथून जवळच असल्याने याच पुलावरून सीमावर्ती भागातून कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा येथील भाविक येत असतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्यात यावी भाविकांची व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी माजी सभापती व्यंकटराव नाईक. सरपंच श्रीकांत काळे व्यंकटराव नाईक विठ्ठलराव नाईक यांच्यासह अनेक जणांनी केले आहे..

anews Banner

Leave A Comment