Home Breaking News खाजगी बस व ट्रॅव्हल्सदारांनी जर अधिक तिकिट दर आकारल्यास तक्रार नोंदवावी ;...

खाजगी बस व ट्रॅव्हल्सदारांनी जर अधिक तिकिट दर आकारल्यास तक्रार नोंदवावी ; परिवहन अधिकारी आ. राऊत

199

खाजगी बस व ट्रॅव्हल्सदारांनी जर अधिक तिकिट दर आकारल्यास तक्रार नोंदवावी ; परिवहन अधिकारी आ. राऊत

नांदेड, दि. ९ – राजेश एन भांगे

जिल्हयात खाजगी बस, ट्रॅव्हल्स, कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने तिकिटदर आकारल्यास, तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे, आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले आहे.
27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. तक्रारी संदर्भाने उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची, रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच खाजगी कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस.टी. बस साठी येणाऱ्या प्रती किलो मीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी mvdcomplaint.enf2@gmail.com वर तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleदिवाळी नंतर योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात याव्यात ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleमुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.