Home गुन्हेगारी नांदगाव पोलीस स्टेशनचा हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या...

नांदगाव पोलीस स्टेशनचा हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात रक्षक च बनले भक्षक

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0024.jpg

नांदगाव पोलीस स्टेशनचा हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात
रक्षक च बनले भक्षक
नांदगाव (अनिल धामणे) नांदगाव तालुका हा भष्ट्राचारा साठी व अवैद्य धंदयासाठी कृप्रसिध्द असून कायम ए.सी. बी . च्या रडारवर आहे. तहसिल कार्यालय ‘ पंचायत समिती ‘ भुमी अभिलेख, ‘ विज वितरण कंपनी ‘ यासह इतर सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी एसीबी कडून पकडले गेले आहे. यात एक विभाग नेहमीच टळत होता . तो म्हणजे पोलीस विभाग पंरतू याच विभागातील दोन महाभाग काल रात्री उशीरा झालेल्या कारवाईत अलगत ए. सी. बी च्या जाळयात अडकले.
याबाबत अधीक माहीती अशी की तकारदार पुरूष वय २२ वर्ष याच्या तक्रारी वरून आलोसे १) सुरेश पंडीत सांगळे (वय ५४) व्यवसाय नौकरी पोलीस हवालदार नेमणुक नांदगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण २) अभिजीत कचरू उगलमुगले (वय २९ ) व्यवसाय नौकरी पोलीस शिपाई नेमणुक नांदगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांना रूपये ३५००० /- ची लाच घेतानां रंगेहात अटक करण्यात आली.
यातील आलोसे क्र. १ यांनी नांदगाव पोलीस ठाणे येथे तक्रारदार यांचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर जमा केलेला होता तो सोडविण्यासाठी पंचासमक्ष दिनांक २७/७/ २२ रोजी तक्रारदार याचेकडे ३५०००/= रूपयाची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले होते .तसेच यातील आलोसे क्रं. २ याने आलोसे क्र. १ यास लाच घेण्याकामी प्रोस्ताहीत केले होते. म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर सापळा यशस्वी होण्यासाठी सापळा अधिकारी संदीप सांळुकें पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नशिक यांनी तर सापळा पथकात पो. ह. पंकज पळशीकर ‘ पो. ना. प्रभाकर गवळी ‘ वैभव देशमुख ‘ पो. ह. संताेष गांगुर्डे सर्व नेमणूक ला.प. विभाग नाशिक यांनी सुनील कडासणे पोलीस अधिक्षक ला. प. वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक नारायण न्याहळदे अप्पर पोलीस अधिक्षक नाशिक याच्या मार्गदर्शना खाली यशस्वी करण्यात आला.
दरम्यान महसुल विभागातील गौणखनिज विषयात पोलीसांचा वाढता हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरत असून वाढत्या वाळू माफी यांवर, कारवाई कोण करणार उपविभागीय, अधिकारी येवला, तहसीलदार, नांदगांव का,हा प्रश्न ,पुढे येत आहे

Previous articleसंततधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या.
Next articleसंपादक राजेश कोचर यांचे वर न.पा. हिंगणघाट मध्ये हमला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here