Home बुलढाणा संततधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत...

संततधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या.

138

आशाताई बच्छाव

IMG-20220913-WA0062.jpg

संततधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या.

जळगाव जामोद सतिश पाटील. :– गेल्या तीन-चार दिवसापासून संपूर्ण राज्यात संतत धार पाऊस चालू असून जळगाव जामोद तालुक्यातील या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे चांगलेच नुकसान केलेले आहे.

यामध्ये काही भागातील जमिनी ह्या पिकांसह खरडुन गेल्या त्यामध्ये सोयाबीन ,तूर, कपाशी आदी काही पिके जमीन दोस्त झाली. तर नदीकाठील विहिरी ह्या पूर्णपणे खसलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण तयार झालेले आहे.

तरी शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करता या झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.

अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल.

ही मागणी घेऊन आज दिनांक १३ सप्टेंबरला तहसीलदार मॅडम यांच्याकडे स्थानिक शेतकरी व भूमित्रांच्या वतीने केली.

यावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील, अश्पाक देशमुख, वैभव जाणे, आकाश आटोळे, अजय गिरी, अनंता पारस्कार, शुभम रोठे, ज्ञानेश्वर पाटील, विजय तिजारे, विजय रोठे, सतीश निंबाळकर, विजय वंडाळे, गजानन मानकर, सदाशिव जाणे, अवी पाटील, योगेश पोटे, अनिल गायकवाड, अतुल गायकवाड, महेश पारसकर, मोहन पारस्कर ,दुर्गेश अबंलकार तसेच तालुक्यातील बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते.

Previous articleकोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!
Next articleनांदगाव पोलीस स्टेशनचा हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात रक्षक च बनले भक्षक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.