Home रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!

कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!

184

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0035.jpg

कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!

रत्नागिरी ,(सुनील धावडे): मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यापर्यंत धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला दिनांक 15 सप्टेंबरपासून विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे.

सध्या मुंबईतील सीएसएमटी ते गोव्यातील करमाळी दरम्यान धावणारी (22119/22120) तेजस एक्सप्रेस दिनांक १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार आहे. त्याआधी दिनांक 15 सप्टेंबरपासून या वातानुकूलित आलिशान एक्सप्रेस गाडीला सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसप्रमाणे विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे आता ही गाडी एकूण पंधरा एल एच बी कोचसह धावणार आहे.

मुंबईहून गोव्याला येणारे प्रवासी तसेच पर्यटकांकडून आधीपासून जनशताब्दी एक्सप्रेसला असलेल्या विस्टा डोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेत रेल्वेने याच मार्गावरील तेजस एक्सप्रेसला देखील पारदर्शक काचानी युक्त असा अत्याधुनिक विस्टा डोम कॉच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleचित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी
Next articleसंततधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.