Home रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

226

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0036.jpg

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

रत्नागिरी,(सुनील धावडे) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी शैक्षणिक क्रीडाशिक्षक श्री. कदम उपस्थित होते. जीजीपीएस शाळेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. शाळेच्या देदिप्यमान यशाबद्दल शैक्षणिक उठाव म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या साधनांसाठी किंवा गरजेच्या गोष्टीसाठी हा निधी खर्च करता येणार आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा- अॅड. दीपक पटवर्धन
Next articleकोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.