• Home
  • 🛑 **अहमदनगरचे…! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री …..! अनिल राठोड यांचे निधन झाले.** 🛑

🛑 **अहमदनगरचे…! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री …..! अनिल राठोड यांचे निधन झाले.** 🛑

🛑 **अहमदनगरचे…! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री …..! अनिल राठोड यांचे निधन झाले.** 🛑
✍️अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :⭕कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज (बुधवार 5 ऑगस्ट) पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुत्र विक्रम राठोड आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला..

अनिल राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते

**भैया’ नावाने प्रसिद्ध होते**….⭕

anews Banner

Leave A Comment