• Home
  • 🛑 **वारजे माळवाडीत…! कोयता गॅंगचा धुमाकूळ** 🛑 ✍️पुणे

🛑 **वारजे माळवाडीत…! कोयता गॅंगचा धुमाकूळ** 🛑 ✍️पुणे

🛑 **वारजे माळवाडीत…! कोयता गॅंगचा धुमाकूळ** 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे/वारजे:⭕ वारजे माळवाडी येथे चार जणांच्या कोयता गॅंगने रविवारी सायंकाळी धुमाकूळ घातला. नागरिकांमध्ये दहशत पसरवत तीघांना बेदम मारहाण केली आहे.

यामध्ये एका डिलेव्हरी बॉयवर कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील अरोपी हे 19 ते 24 वयोगटातील आहेत.

नितीन लक्ष्मण पदमाकर (20,रा.रामनगर, वारजे), महादेव प्रल्हाद जावळे (24,रा.रामनगर, वारजे), मयूर सुरेश कुडले (19, कॅनॉल रोड, वारजे) आणि अनिल गुरुनाथ सासवे (रा.रामनगर, वारजे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहित सावळाराम पोटे (23,रा.कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रोहित हा एका कंपनीत डिलेव्हरी बॉयचे काम करतो. तो काम संपल्यावर सहकारी कुणाल साकला व आकाश वर्मा यांच्यासह कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्ससमोर बाकड्यावर मोबाईलवर गेम खेळत बसले होते.

तेवड्यात त्यांना नागरिकांचा आरडा ओरडा ऐकू येऊ लागला. त्यांनी पाहिले असता, चौघे आरोपी हातात कोयते घेऊन त्यांच्या दिशेने येत होते. रस्त्यातील फळे व भाजी विक्रेते त्यांचे सामान तेथेच सोडून पळून गेले होते.मात्र फिर्यादी त्याच्या सहकाऱ्यांसह बाकड्यावर बसून राहिला होता.

यामुळे यातील एका आरोपीने हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत तुला आमची भिती वाटत नाही का? आम्ही येत असताना उठून उभा का राहिला नाहिस? आम्ही येथले भाई आहोता, आम्हाला मान दिला नाही तर तुला खल्लास करुन टाकेल अशी धमकी दिली.

यावर घाबरलेल्या फिर्यादी व त्याच्या मित्रांनी तुम्ही गरीबांना का त्रास देता असे म्हणत गयावया केली. मात्र आरोपींनी फिर्यादीला उलट्या कोयत्याने मारहाण केली तसेच रस्त्यावर पडलेला दगड डोक्‍यात घातला.

त्याचे दोन्ही मित्र त्याला सोडवायला गेले असता त्यांनाही लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने फिर्यादी चक्कर येऊन रस्त्यावर पडला. दरम्यान त्याला कुणाल व आकाश यांनी त्याला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना याची खबर दिली. तो पर्यंत आरोपी पळून गेले होते….⭕

anews Banner

Leave A Comment