• Home
  • 🛑 कोरोनामुळे MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी अशी विनंती….! उध्दव ठाकरे यांना निवेदन दिलं 🛑

🛑 कोरोनामुळे MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी अशी विनंती….! उध्दव ठाकरे यांना निवेदन दिलं 🛑

🛑 कोरोनामुळे MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी अशी विनंती….! उध्दव ठाकरे यांना निवेदन दिलं 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕कोरोनामुळे #MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी, #MPSC साठी स्वतंत्र ऑफिस देऊन सदस्य संख्येत वाढ करावी व प्रलंबित मुलाखती पूर्ण करुन उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, कक्ष अधिकारी ते सहसचिवांच्या सेवा ज्येष्ठता याद्या सुधारीत कराव्यात, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना निवेदन दिलं.

याशिवाय मोटार वाहन निरीक्षक पदाच्या प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, शहरी भागासाठीही रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एखादी योजना आणावी, गट क सेवा पदांच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल लावावा, गट ब व क मधील रिक्त पदे भरावीत हे प्रश्नही यावेळी मांडले.

तसंच #कोरोना, शेती, उद्योग, बांधकाम क्षेत्र, वारकरी व पत्रकारांचे प्रश्न, इ-पास व शिक्षकांच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा केली.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं…..⭕

anews Banner

Leave A Comment