Home Breaking News नांदेड जिल्ह्यात आज कोरोनातून ७५ रूग्ण बरे तर १९६ बाधितांची भर व...

नांदेड जिल्ह्यात आज कोरोनातून ७५ रूग्ण बरे तर १९६ बाधितांची भर व सहा जणांचा मृत्यू –

128
0

नांदेड जिल्ह्यात आज कोरोनातून ७५ रूग्ण बरे तर १९६ बाधितांची भर व सहा जणांचा मृत्यू –

नांदेड,दि. ५ ; राजेश एन भांगे

जिल्ह्यात आज रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 75 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 933 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 692 एवढी झाली असून यातील 1 हजार 132 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 444 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 57 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 37 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे.

मंगळवार 4 ऑगस्ट रोजी नायगाव नांदेड येथील 50 वर्षाची एक महिला, साठेनगर मुदखेड येथील 61 वर्षाचा एक पुरुष शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 5 ऑगस्ट रोजी शिवाजी चौक लोहा येथील 74 वर्षाचा एक पुरुष, वाघी रोड नांदेड येथील 52 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, शिवदत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 103 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 75 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथील 5, हदगाव कोविड केअर सेटर 10, देगलूर कोविड केअर सेटर 20, खाजगी रुग्णालय 8, मुखेड कोविड केअर सेटर 20, धर्माबाद कोविड केअर सेटर 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 10 असे एकूण 75 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये अर्धापूर तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 1, नांदेड शहरात 23, मुदखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 8, लातूर 1, पुणे 1, ठाणे 1, देगलूर तालुक्यात 18, हदगाव तालुक्यात 10, किनवट तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 3, नांदेड ग्रामीमध्ये 4, मुखेड तालुक्यात 18, हिंगोली 1, परभणी 4, पुसद 2 असे 107 बाधित आढळले.

अँटिजेन तपासणीद्वारे अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, नांदेड शहरात 63, नायगाव तालुक्यात 4, परभणी 2, बिलोली तालुक्यात 2, हदगाव तालुक्यात 5, माहूर तालुक्यात 6, मुदखेड तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 1 असे 89 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 444 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 135, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 540, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 81, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 35, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 106, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 107, लोहा कोविड केअर सेंटर येथे 6, हदगाव कोविड केअर सेंटर 80, भोकर कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 19, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे 25, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20, माहूर कोविड केअर सेंटर येथे 3, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 5, खाजगी रुग्णालयात 157, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 631,
घेतलेले स्वॅब- 18 हजार 168,
निगेटिव्ह स्वॅब- 14 हजार 156,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 196,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 692,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 13,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
मृत्यू संख्या- 103,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 132,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 444,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 147.

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous article   *पालघर जिल्ह्यात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हाधिकारी शिंदेचे आवाहन*
Next article🛑 कोरोनामुळे MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी अशी विनंती….! उध्दव ठाकरे यांना निवेदन दिलं 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here