Home Breaking News 🛑 *माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर….! संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व...

🛑 *माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर….! संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व हरपले आहे* 🛑

133
0

🛑 *माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर….! संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व हरपले आहे* 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विशेष बातमी :⭕ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील, चारित्र्यसंपन्न लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे..

आपल्या सर्वांसाठी दादासाहेब म्हणून परिचित असलेले आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे एक कणखर, मुरब्बी, धुरंदर, अभ्यासू, लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. नेहरू-गांधी घराण्याच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवन प्रवास अगदी जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या एकूण कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी शून्यापासून सुरुवात करून विश्वाची निर्मिती केली होती असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजकारण आणि राजकारणात त्यांनी कमालीची झेप घेतली होती. निलंगा हे त्यांच्या कायम हृदयापाशी राहिले आहे, तेथून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले.
महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर जिल्हा आणि निलंग्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे..

महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उभारणी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात, विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प, आपणा सर्वांना परिचित असलेलले उजनी धरण, निम्न तेरणा प्रकल्प मसलगा धरण यासह त्याने केलेली अनेक कामे आपणाला त्यांचे कायम स्मरण देत राहतील, खरेतर आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाने लातूर जिल्ह्याची ओळख पटते, काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात या तिन्ही नेत्यांचे योगदान, तपश्चर्या आणि श्रम मोलाचे ठरले आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना मी लहानपणापासूनच पाहिले आणि ऐकले आहे…

मी राजकारणात आल्यानंतर त्यांचा मला स्नेह आणि जवळून सहवास लाभला आहे. विधिमंडळात मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलो तेव्हा तेही निलंगा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले होते.

त्यामुळे विधीमंडळात त्यांच्या समवेत एकत्रित काम करण्याचे सौभाग्य मला मिळालेले आहे. त्या काळातील त्यांच्यासोबतचे अनेक अनुभव माझ्या कायम स्मरणात राहतील, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते ते मी शिकलो आहे.

आज ते आपल्यातून निघून गेले आहेत त्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने निलंग्याने एक महामेरू, लातूरने महानायक आणि महाराष्ट्राने एक सच्चा काँग्रेसजन गमावला आहे…

निलंगेकर कुटुंबाच्या या दुःखाच्या क्षणी आम्ही संपूर्ण देशमुख कुटुंबीय त्यांच्या समवेत आहोत. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. निलंगेकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे..⭕

Previous article🛑 **अहमदनगरचे…! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री …..! अनिल राठोड यांचे निधन झाले.** 🛑
Next article🛑 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे.🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here