Home Breaking News 🛑 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे.🛑

🛑 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे.🛑

113
0

🛑 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे.🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 ऑगस्ट : ⭕ जर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्ससाठी प्रवेश घेण्याच्या तयारीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी आहे. यावर्षी बीआर्क अभ्यासक्रमाच्या प्रवेशांच्या नियमांमध्ये मोठी सवलत दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

ही सवलत विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांसंदर्भात दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले की ‘ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) या विषयांसह उत्तीर्ण केली आहे आणि १० + ३ स्कीममध्ये गणितासह डिप्लोमा केला आहे, ते सर्व विद्यार्थी २०२०-२१ मध्ये बीआर्क कोर्सेसना प्रवेश घेण्यास पात्र आहेत.’

म्हणजेय यावर्षी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. बारावीत वरील विषयांसह केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे..

शैक्षणिक सत्रासाठी जेईई मेन २०२० (JEE Main 2020) पेपर – २ आणि नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर (NATA 2020) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.

काही दिवसांपूर्वी आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि अन्य केंद्रीय सहाय्यता प्राप्त इंजिनीअरिंग संस्थांमध्ये (CFTI) अॅडमिशनसाठी बारावीच्या किमान गुणांची अट शिथिल केली होती. आता हाच निर्णय बॅचलर ऑफ आर्किटेक्चर साठी देखील घेण्यात आला आहे.

देशातील करोना संक्रमणाच्या स्थितीमुळे अनेक बोर्डांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. काही बोर्डांनी संपूर्ण परीक्षेच्या आधारावर तर कधी इंटरनल असेसमेंटच्या आधारे निकाल तयार केले. असात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

NATA (National Aptitude Test in Architecture) एकदा स्थगित करण्यात आली आहे. सध्या तरी या परीक्षेची नवी तारीख २९ ऑगस्ट २०२० आहे. कोविड – ९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ए आणि बी दोन्ही परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. आधी ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये (PCM) किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य होते. यावर्षी ही अट रद्द करण्यात आली आहे.⭕

Previous article🛑 *माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर….! संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व हरपले आहे* 🛑
Next article🛑 मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here