Home Breaking News 🛑 मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला 🛑

🛑 मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला 🛑

97
0

🛑 मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 ऑगस्ट : ⭕ मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या आणि झाडं पडल्याच्या घटना घडल्या. या पावसाचा परिणाम गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या एसटी बसवरही झाला आहे. गणेशोत्सवाकरता कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांनी जय्यत तयारी केली होती. गणपतीनिमित्त मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाण्यासाठी २३ बस आज सोडण्यात येणार होत्या,

मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे  ठिकठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन ठाणे विभागातून दोन अशा चार बसेस आज मार्गस्थ करण्याचे नियोजन होते .तथापि, मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे -माणगाव आदी ठिकाणी पाणी आल्याने सदरची वाहतूक आजच्यासाठी बंद करण्यात आले आहे.

उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल रात्रीपासून व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरूवात झाली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटात गणपतीसाठी कोकणात कसं जायचं? याची चिंता चाकरमान्यांना सतावत होती. दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं.

▶️ कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम :-

➡️ जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे.

➡️ त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे.

➡️ १२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल.

Previous article🛑 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे.🛑
Next article🛑 मुंबईत पावसाची दमदार हजेरी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here