• Home
  • 🛑 मुंबईत पावसाची दमदार हजेरी 🛑

🛑 मुंबईत पावसाची दमदार हजेरी 🛑

🛑 मुंबईत पावसाची दमदार हजेरी 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 ऑगस् : ⭕ हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला. मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावलीय. आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. मुंबईत सखल भागांमध्ये पाणी शिरलंय. पावसाचा फटका बसल्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने तसेच घोडबंदर परिसरात पाणी साचल्याने तिन्ही ठिकाणच्या एस. टी. डेपो मधून मुंबईला जाणारी एस. टी. सेवा बंद करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला.

विरार हद्दीतील तानसा नदीला पूर आलाय… भाताने-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटलाय. भाताने, नवसाई, तळ्याचा पाडा, आडणे, जामभुलपाडा यासह अन्य गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

कल्याण पश्चिमेतील चिकणकर परिसरातील संत तुकाराम नगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. नाल्याची रुंदी वाढवण्याकडे केडीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भभवल्याची स्थानिकांनी माहिती दिली.⭕

anews Banner

Leave A Comment