Home Breaking News नांदेड मध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

नांदेड मध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

116
0

नांदेड मध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

नांदेड, दि.१२ – राजेश एन भांगे

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खाजगी रुग्णालयातही बेड नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. नांदेड शहरात ८०० कोरोना रुग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार ९८६ वर पोहचली आहे. सद्य:स्थितीत ३ हजार २८३ रुग्णावर कोविड केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पंजाब भवन, एनआरआय, महसूल भवन येथेही रुग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोना तपासणीनंतर लक्षणे नसलेले रुग्ण पंजाब भवन, एनआरआय येथे पोहचत आहे. तिथे तपासणी करुन लक्षणे नसलेल्या रुग्णांना मागणीनुसार गृह विलगीकरणात ठेवण्याची मुभा देत आहे. या प्रक्रियेत लक्षणे नसणे ही बाब महत्वाची आहेच. विलगीकरण कालावधीत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत रुग्णाबरोबरच नातेवाईकाकडून हमीपत्र घेतले जात आहेत. याबरोबरच रुग्णाची घरी विलगीकरणात राहण्याची व्यवस्था आहे की नाही? याची खात्रीही केली जात आहे.
रुग्ण राहत असलेल्या भागातील बील कलेक्टर मार्फत रुग्णाच्या घराची पाहणी केली जात आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. एका कुटुंबासाठी एकच स्वच्छतागृह असेल तर रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची परवानगी दिली जात नाही. यासह महापालिकेच्या एका आरोग्य कर्मचाऱ्याची त्याच्यावर निगराणीसाठी नियुक्ती केली जात आहे. प्रकृतीबाबत सदर कर्मचारी रुग्णाची दररोज माहिती घेत आहे. काळजी घेणारेही महापालिका आरोग्य विभागाकडे याबाबत कळवत आहेत. या तपासणीत ताप, रक्तातील आॅक्सीजनचे प्रमाण, रक्तदाब त्यासह श्वास घेण्यास काही अडचण तर नाही ना, याची पाहणी केली जात आहे.

लक्षणे नसलेल्यांना गृह विलगीकरणाच्या सुचना
च्लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सूचना आयसीएमआर, राज्य शासनानेही दिली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बेडची संख्या कमी पडू नये या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी उपचाराची गरज असलेल्या, लक्षणे असलेल्या रुग्णांना बेडची आवश्यकता आहे. शहरात अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या ११३० इतकी आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत आणि ज्यांच्याकडे विलगीकरणाची व्यवस्था आहे त्यांना परवानगी दिली जात आहे. पण ही मुभा आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच दिली जात असल्याचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here