Home Breaking News राम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ, पहिल्या पिलरची महिन्यात चाचणी, हजार वर्षे टिकेल इतका...

राम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ, पहिल्या पिलरची महिन्यात चाचणी, हजार वर्षे टिकेल इतका मजबूत खांब

95
0

राम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ, पहिल्या पिलरची महिन्यात चाचणी, हजार वर्षे टिकेल इतका मजबूत खांब

विशेष प्रतिनिधि – राजेश एन भांगे

आयोध्या, दि. १२ – प्रदीर्घ काळानंतर अयोध्येत अखेर राम जन्मभूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास अवजड ड्रिलिंग मशीनद्वारे मंदिराच्या पहिल्या पिलरसाठी ड्रिलिंग सुरू झाले. याआधी पायाच्या पिलरची एका महिन्याच्या आत चाचणी होणार आहे. ५ एकरांत मंदिराच्या पायासाठी जमिनीच्या आत एक मीटर व्यासाचे १०० ते १५० फुटांचे १२०० काँक्रीटचे पिलर्स बांधले जातील. हे सर्व पिलर्स एक हजार वर्षे मजबूत राहतील, अशा पद्धतीने याची बांधणी होणार आहे. त्यावर मंदिराचा १९ फूट उंच काँक्रीटचा प्लॅटफॉर्म बांधण्यात येईल. याच प्लॅटफाॅर्मवर १६१ फूट उंच व पाच शिखरे असलेले भव्य श्रीराम मंदिर उभे राहील. ड्रिलिंग करण्यापूर्वी पथकाच्या अभियंत्यांनी आणि कामगारांनी जन्मभूमीवर भगवान विश्वकर्मां यांची पूजा केली. हे बांधकाम करताना यंत्रात बिघाड अथवा अडथळा येऊ नये यासाठी ही पूजा होती. दरम्यान, या वेळी विश्वस्त, पुजारी आणि राम मंदिराचे वास्तुकार आशिष सोमपुरा यांची उपस्थिती होती. मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले होते.

काँक्रीटचे मानक व प्रमाण चेन्नई आयआयटीच्या टीमने ठरवले
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले, यंत्राने जमिनीत एक मीटर व्यासाचे १०० फूट खोल विहिरीत काँक्रीटचे मिश्रण टाकण्यात येईल. पहिल्या पिलरचे बांधकाम परीक्षणासाठी करण्यात येईल. एका महिन्यानंतर पिलरच्या काँक्रीटच्या क्षमतेची चाचणी होणार आहे. गरज भासल्यास काँक्रीटची मजबुती व आयुर्मान वाढवण्यासाठी आयआयटी चेन्नईच्या तज्ञांचा पुन्हा सल्ला घेण्यात येणार आहे. पिलरच्या वापरात होणाऱ्या साहित्याचे मानक व प्रमाण आयआयटी चेन्नईच्या संशोधन पथकाने निर्धारित केले आहे. यात स्टीलचा वापर होणार नाही.

1200 विहिरींच्या खोदकामासाठी तीन-चार रिंग मशीन
न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले, मंदिराच्या बांधकामासाठी १२०० विहिरी खोदण्यात येणार आहेत. यासाठी तीन ते चार रिंग मशीन लागतील. पहिल्या मशीनद्वारे काम सुरू झाले आहे. राम जन्मभूमी परिसरात सुमारे ५५ फुटांवर पाणी आहे. यासाठी नदीवर पुलाचे बांधकाम करताना ज्याप्रमाणे पिलर्सची उभारणी केली जाते, त्याप्रमाणेच येथे पिलर्स उभारण्यात येतील. पिलर जितका पाण्यात राहील तेवढी त्याची मजबुती अधिक असेल, असे मत अभियंत्यांनी व्यक्त केले.

Previous article*मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा महासंघाचा इशारा
Next articleनांदेड मध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here