Home सोलापूर चंद्रभागेकाठी नवीन घाट, पार्किंगचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी शंभरकर

चंद्रभागेकाठी नवीन घाट, पार्किंगचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी शंभरकर

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0028.jpg

चंद्रभागेकाठी नवीन घाट, पार्किंगचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी शंभरकर

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क

यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे विश्वस्त, वारकरी संघटनेचे अध्यक्ष, महाराज मंडळी स्थानिक नागरिक व्यापारी यांनी वाहनतळ रस्ते घाट बांधणी बाबत विविध सूचना मांडल्या.आभार नगरपरिषद विभागाचे प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी आभार मानले
श्री क्षेत्र देहू , आळंदी, डोंगर, पंढरपूर पालखी तळ व मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी वारकरी संघटना विश्वस्त, महाराज मंडळी व्यापारी,नागरिक, पत्रकार यांच्या सूचना,मते विचारत घेऊन सर्वकष आराखडा तयार करण्यात येईल, अशी गवाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली जिल्हा नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यात नव्याने सामाविष्ट करावयाच्या कामाबाबत आढावा बैठकीत श्री, शभरकर बोलत होते, बैठकीला खासदार डाॅ. जय सिद्धेश्वर महास्वामी,आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील ,माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नगरपालिका मुख्यधिकारी अरविंद माळी यांच्यासह वारकरी संस्थेचे विश्वस्त महाराज मंडळी पंढरपूर येथील स्थानिक व्यापारी नागरिक उपस्थित होते आमदार समाधान अवताडे ऑनलाइन उपस्थित होते त्यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यांचंबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री माघी या चार प्रमुख यात्रा भारतात, पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मेळाव्यात या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे, यामध्ये मंदिरातील मूळ वस्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे, यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यावित करणे आधी बाबींचा समावेश असणार आहे, तीर्थक्षेत्र विकास बाराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक, व्यापारी संघटना वारकरी यांनी लेखी सूचना आठवड्याभरात द्याव्यात, याचाही विचार करण्यात येणार आहे

Previous articleसंपादक राजेश कोचर यांचे वर न.पा. हिंगणघाट मध्ये हमला
Next articleलक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ! उमेश परिचारक यांच्या हस्ते झाला सत्कार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here