Home Breaking News *मराठा मशाल मोर्चा लवकरच* *मातोश्रीवर धडकणार*

*मराठा मशाल मोर्चा लवकरच* *मातोश्रीवर धडकणार*

105
0

*मराठा मशाल मोर्चा लवकरच* *मातोश्रीवर धडकणार*

*युवा मराठा न्यूज*

लवकरच (७ नोव्हेंबरला) मराठा मशाला मोर्चा मातोश्रीवर धडकणार
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजात राज्यात सर्वच ठिकाणी आक्रोश पसरलेला आहे. त्यातच २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वकीलांना सुनावणीला हजर राहण्यास उशीर झाला होता. त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आता थेट मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या मोर्चात मराठा आमदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत ७ नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्यात यावी, असा ठराव देखील या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Previous article*एस.टी.चालकावर “बिगारी “काम करणेची आली वेळ*
Next article*बिस्किट सेवनामुळे अनेक आजाराना* *निमंत्रण*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here