आशाताई बच्छाव
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक देशभावनेचा उर्जादायी सोहळा”
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कावी येथे शाळेचे मुख्याध्यापक आर.जे. भताने यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयात ध्वजारोहण तसेच प्रभातफेरी संपन्न झाली. प्रथमतः शाळेतुन प्रभातफेरी काढण्यात आली. यात तिरंगा रंगाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी, विद्यालयाचे स्काऊट चे पथक, झांज पथक, क्रीडा विभागातील विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन आणि आपला राष्ट्राभिमान घोषणांच्या माध्यमातून दाखवत प्रभातफेरीत सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.भताने सर उपस्थित होते तर जेष्ठ शिक्षक श्री.एस.डी.सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण संपन्न झाला. यानंतर श्री. एस.एस सकनूर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी देश भक्ती गीत सादर करत उत्सवात चैतन्य निर्माण केले.
यानंतर जेष्ठ शिक्षक श्री.एस.डी.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवाची पार्श्वभूमी मांडत मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.आर.जे.भताने यांनी विद्यार्थ्यांनी ” हर घर तिरंग” या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याबद्दल विद्यार्थी तसेच पालकांचे विशेष आभार व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्याघरी ध्वज विसर्जन करतेवेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी.मयुरी दत्ता उगले यांनी केले तर आभार श्री ए.पी साठोणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद श्री एम.जी.काळे, श्री ए.आर देवकर, श्री यु.एस.मुंढे, श्री एस.टि.ठोंबरे यांनी प्रयत्न केले.
यावेळी शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष- श्री सुदाम हराळ, उपाध्यक्ष- श्री प्रल्हाद घुगे तसेच SMC सद्स्य , पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक उर्जादायी आणि प्रेरणादायी उपक्रम….प्रत्येक भारतीयांच मन अभिमानानं आणि स्वाभिमानानं फुलून जावं तसंच देशभक्ती आणि क्रांतिवीरांच्या स्मरणातून तरुणांची , अबाल वृद्धांची देशभावना देशप्रेम या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून दिसून आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक अविस्मरणीय असा नयनरम्य सोहळा पार पडला.






