Home नाशिक नाशिक सिटीलिंक बसचालकांचा संप अखेर मागे

नाशिक सिटीलिंक बसचालकांचा संप अखेर मागे

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_160805.jpg

नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या तपोवन येथील वाहकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. हा संप मिटल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच बससेवा सुरू होणार असली तरी शनिवार २३ मार्च २०२४ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहे.

तपोवन डेपो येथील बसेसना वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिवव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या कंपनीच्या वाहकांनी गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ पासून संप पुकारला होता. नियमित वेतन, पीएफ,ईएसआयसी व रजेचे पैसे अकाऊंटला जमा करणे, इंक्रिमेंट, बोनस अश्या विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता.

शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४ रोजी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित ज्या मागण्या तात्काळ पूर्ण करणे शक्य नाही. अश्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्याने अखेर हा संप मागे घेण्याचा निर्णय वाहकांनी घेतला आहे.

वाहकांच्या संप मागे घेण्याच्या निर्णयामुळे आता नाशिककरांची जीवनवाहिणी असलेली सिटीलिंक बस ९ दिवसांनंतर आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. तपोवन डेपो येथील बसेस सायंकाळीच सुरू होणार असल्या तरी शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहे. वाहक संपामुळे गेले ९ दिवस प्रवाश्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्याबद्दल सिटीलिंक प्रशासन सर्व प्रवाश्यांचे दिलगीर आहे. तसेच बससेवा नियमित सुरू होत असल्याने प्रवाश्यांनी या बससेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleनवरा-बायकोतील नातं
Next articleकोथळी येथे हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here