Home बुलढाणा कोथळी येथे हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल

कोथळी येथे हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_161310.jpg

कोथळी येथे हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल

मोताळा : युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

मोताळा, दि. २३ (प्रतिनिधी)

तहसील कार्यालयाचे पथक पाठविल्याच्या कारणाचा राग मनात धरुन २० मार्च रोजी कुर्बान शाह मिस्कीन शाह यांना फोन करुन कोथळी बसस्टॅण्डवर बोलावून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी १२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील कुर्बान शाह मिस्कीन शाह यांनी बोराखेडी – पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे – की, शेख ईरफान शेख हशम, आरीफ खान अहमद खॉन, शेख जमील शेख रशिद यांचेकडे जेसीबी असून ते रात्री अवैधरित्या – सरकारी जमिनीतून खड्डातून मुरुमाचा उपसा करुन त्याची विक्री करतात. दरम्यान, १९ मार्च रोजी ११ वाजता तहसील कार्यालयाचे

पथक आल्याने आरोपीं जेसीबी व ट्रॅक्टर घेवून तेथून पळून गेले होते. सदर तहसील कार्यालयाचे पथक हे फिर्यादी व साक्षीदार यांनी पाठविले आहे, असे वाटल्याने नमूद आरोपी हे फिर्यादी व साक्षीदार यांचा राग धरला. तसेच २० मार्च रोजी शेख जमील शेख रशिद याने त्याचे मोबाईलवरून साक्षीदार सय्यद युसुफ सय्यद मुसा यांना फोन करुन बस स्टॉप कोथळी येथे बोलावून नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरिफ खॉन अहमद खॉन याने फिर्यादीचे मोटार सायकलचे नुकसान करुन सर्व आरोपीतांनी संगणमत करुन साक्षीदार सैय्यद युसुफ सय्यद मुसा यांना चापटा बुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर आरीफ खॉन अहमद खॉन याने सय्यद युसुफ सय्यद मुसा याचे बरगडीत लोखंडी

 

 

पाईपाने मारहान केली आहे. तसेच त्याने सय्यद युसुफ सय्यद मुसा याला खाली पाडून त्याचे गळ्यावर व छातीवर पाय देवून त्याला मारुन टाकण्याच्या कुर्बान शाह मिस्कीन शाह यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आरिफ खॉन अहमद खॉन, शेख जमील शेख रशिद, शेख ईरफान शेख हाशम, शेख करीम शेख रशिद, शेख रशिद शेख गनी, शेख नईम शेख रशिद, नाशिर खॉन नसिम खॉन, अमीन खॉन अहमद खॉन, अहमद खॉन असउल्ला खॉन, शेख कलीम शेख हाशम, शेख सलीमा शेख हाशम, शेख वशिम शेख इक्बाल सर्व रा. कोथळी यांच्यावर बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७ भादंवी सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleनाशिक सिटीलिंक बसचालकांचा संप अखेर मागे
Next articleशेगावचे गटविकास अधिकारी एस व्हि देशमुख बदली होऊनही अद्याप शेगावची कार्यरत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here