Home गडचिरोली वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपुर येथे वाघाची दहशत कायम वन विभागाने तत्काळ वाघास जेरबंद...

वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपुर येथे वाघाची दहशत कायम वन विभागाने तत्काळ वाघास जेरबंद करावे खासदार अशोकजी नेते

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20221004-WA0012.jpg

वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपुर येथे वाघाची दहशत कायम

वन विभागाने तत्काळ वाघास जेरबंद करावे

खासदार अशोकजी नेते

या संदर्भात वनविभागाचे अधिकारी व एकलपुर या गावातील गावकऱ्यांच्या उपस्थिती घेतली बैठक.

वडसा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- मागील काही दिवसांपासून वडसा वनपरिक्षेत्र अंतर्गत एकलपुर येथील या परिसरात वाघाने खूप धुमाकूळ घातला असून या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्यात वाघाची खूप दहशत निर्माण झाली आहे. वड्सा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपुर येथे वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक भयभीत झालेली आहे.
येथील शेतकरी, शेतमजूर शेतावर जाण्यास नकार देत आहेत. नागरिक सायकल अथवा दुचाकीने जवळच्या गावात जाण्यासाठी घाबरत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांचे शेती वाडीतील कामे ठप्प झाले आहे. यासंबंधीची माहिती प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे यांनी दिली असता तात्काळ या संदर्भाची दखल घेऊन आज एकलपुर येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी भेट देऊन गावातील गावकऱ्यांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेऊन
नागरिकांशी संवाद साधला
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत भ्रमण ध्वनीवरुन गावातील समस्याबाबत निर्देश दिले व तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा,तालुकाध्यक्ष वडसा राजू जेठानी, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी चव्हाणजी, सरपंचाच्या संध्याताई नागमोती, उपसरपंच संजय सहारे, माजी उपसभापती गोपाल ऊईके, ता. महामंत्री योगेश नागतोडे, उपाध्यक्ष प्रमोद झिलपे, दीपक प्रधान, शेवंता अवसरे पं.स.सदस्य,सारीका रामटेके ग्राम.सदस्या,तसेच अनेक पदाधिकारी व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here