Home जालना जालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर

जालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर

115

आशाताई बच्छाव

IMG_20231220_075024.jpg

जालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर
जालना, दिलीप बोंडे: येथील पत्रकार विकासकुमार बागडी यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी मंजूर केला असून श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ देखील केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना पीपल्स बँक निवडणूकीत यावेळी आपण आपले भविष्य आजमाविण्याचा निर्धार श्री. बागडी यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी मंजूर केल्यामुळे आता श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास सुरुवात देखील केली आहे. जालना पीपल्स बँक ही व्यापार्‍यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांचे कामे झाली पाहिजेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. बागडी यानी म्हटले आहे.

Previous articleराष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यासगर दावनगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.