Home जालना राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

128

आशाताई बच्छाव

IMG_20231220_074649.jpg

राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
जालना/दिलीप बोंडे– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप क्रीडा संकुल जालना येथे फुटबॉल स्पर्धा आयोजीत करून करण्यात आला. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी व फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह तलवारबाजी असोसिएशनचे सचिव विजय गाडेकर, इम्रान सिद्दीकी, नवीद खान, निहाल खान, पवन दांडगे, वसीम शेख, फारूक शेख, अकील शेख, राहुल गायके, हारूण खान, समाधान खुराड, आदींची उपस्थिती होती.
फुटबॉल स्पर्धेत फरहान एफ सी क्लब, जालनाने प्रथम क्रमांक तर जिल्हा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र संघाने दुसरा क्रमांक प्रात्त केला. विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रेखा परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन ईस्माईल शेख यांनी केले.
———————-

Previous articleमतदार जनजागृती  चित्ररथाला जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी
Next articleजालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.