Home जालना मतदार जनजागृती  चित्ररथाला जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी

मतदार जनजागृती  चित्ररथाला जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20231220_074202.jpg

मतदार जनजागृती  चित्ररथाला जिल्हाधिकारी

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी

 

जालना, (दिलीप बोंडे) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार नवीन मतदार नाव नोंदणी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेल्या एलईडी चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज पार पडलेल्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, डॉ.दयानंद जगताप, डॉ.श्रीमंत हारकर, प्रतिभा गोरे, तहसीलदार सुमन मोरे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात नवीन मतदार नाव नोंदणी, मृत झालेल्या व्यक्तींचे नाव मतदार यादीतून वगळणे, मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे, ऑनलाईन मतदार नोंदणी आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदान यंत्राच्या जनजागृतीबाबत एकुण 10 एलईडी चित्ररथ गावागावात जाणार असून मतदारांनी ईव्हीएम यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करुन आपल्या शंकेचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाभरात राबविली जातेय ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यातील  पाच विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 699 मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात व परतुर, घनसावंगी, जालना, बदनापूर व भोकरदन येथील तहसील कार्यालयात मतदान प्रात्यक्षिक केंद्र स्थापन केले असून याठिकाणी तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Previous articleराज्यस्तरीय नागभूषण आदर्श समाजरत्न पुरस्काराने” सतीश सोमकुवर सन्मानित
Next articleराष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here