Home नाशिक खेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाचे विसर्जन-

खेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाचे विसर्जन-

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0072.jpg

  1. खेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाचे विसर्जन-

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

परमपूज्य तुकाराम बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी कोटकर सर ,शालेय समितीचे अध्यक्ष श्री दिलीप घोटेकर त्याचबरोबर ज्येष्ठ सभासद श्री शिवनाथ सदाफळ ,श्री रंगनाथ आण्णा गीते, श्री यादव नाना सदाफळ, श्री विजय साबळे ,श्री मयूर सदाफळ त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम गणपती बाप्पांची मान्यवरांच्या हस्ते आरती घेण्यात आली. त्यानंतर लेझीम ढोल पथक यांच्या मंगलमय स्वरात गणपती बाप्पांची विद्यालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाने आयोजित केलेल्या गणपती कार्यशाळेतून उत्कृष्ट गणेश मूर्तीची स्थापना विद्यालयात करण्यात आली होती. आज पाचव्या दिवशी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीचे विद्यालयामध्येच एका पाण्याच्या पिंपात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विद्यालय परिसरात खड्डा खोदून मूर्ती तेथे विसर्जित करून त्या जागेवर एका रोपट्याची लागवड करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवाजी कोटकर सर यांनी पर्यावरण पूरक गणपती बसविण्याची बसविण्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, समाजामध्ये श्रद्धेच्या नावाखाली चाललेला बाजार थांबविण्यासाठी समाजातील रूढीग्रस्त प्रथांना बगल देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यावरण पूरक उपक्रम राबवून एक आदर्श समाजामध्ये निर्माण करावा. यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून धडा घेऊन येणाऱ्या भावी आयुष्यात गणपती बाप्पांची पर्यावरण पूरक मूर्ती बनवून वसुंधरेचा होणारा ऱ्हास थांबूया असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव राष्ट्रीय अस्मिता आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केला म्हणून आपण देखील जलावरण पर्यावरण यांची काळजी घेऊ या. गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्यापासून तर विसर्जनापर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच आज विद्यार्थ्यांना महाप्रसाद देखील देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र गीते यांनी केले तर श्री नितीन दिघे यांनी आभार मानले.

Previous articleश्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह एकनाथ भागवत पारायण सोहळ्यास प्रारंभ —
Next articleगणेश विसर्जनाला DJ मुक्त करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा.-सा.पो.निरीक्षक मा.भालचंद्र तिडके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here