Home नांदेड आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम दिन जल्लोषात...

आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम दिन जल्लोषात साजरा.

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0016.jpg

आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम दिन जल्लोषात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे संचालक प्रा. सोनकांबळे एम. एल., तसेच मुख्याध्यापिका मिस सुनंदा मॅडम, रुपाली मॅडम, प्रियांका मॅडम ,आशिष वाघमारे, इसाक शेख,याच्या हस्ते महापुरूषाच्या प्रतीमेस पुष्प माळा अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माहीम महेबुब कासार या विद्यार्थीनीचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियांका मॅडम यांनी केले. तसेच मराठवाडा निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी स्वामीरामानंद तीर्थ , गोविंदभाई श्रॉफ, दगडाबाई शाळके, दिगंबराराव बिंदू बाबासाहेब परांजपे, या सारख्या शेकडो क्रांतिकारकाना व स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या कुटुंबाची राख रांगोळी करावी लागली. तसेच याकाळतील स्वातंत्र्य सैनिकांनी निस्वार्थ भूमिकेतून निझाम मिर उस्मान अली खान याचा व रजाकार संघटनेचा बंदोबस्त करून मराठवाडा निझामाच्या तावडीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त केला. आणि मराठवाड्यातील जनता सुखी आणि समाधानी झाली. याविषयीचे सखोल मार्गदर्शन प्रा. सोनकांबळे एम. एल. सर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार रुपाली मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित राहून हा कार्यक्रम अत्यंत आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

Previous articleपिक विम्याची २५ टक्के रक्कम अपुरी शेतकरी पुत्राचा आक्रोश !
Next articleपशुधनातील लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी गोठ्याची स्वच्छता व दक्षता घेणे आवश्यक – खासदार प्रताप पाटील चिखलीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here