Home नांदेड पिक विम्याची २५ टक्के रक्कम अपुरी शेतकरी पुत्राचा आक्रोश !

पिक विम्याची २५ टक्के रक्कम अपुरी शेतकरी पुत्राचा आक्रोश !

63
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview.png

पिक विम्याची २५ टक्के रक्कम अपुरी शेतकरी पुत्राचा आक्रोश !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , मुखेड , जांब , येवती , अंबुलगा , जाहुर , चांडोळा या सर्वच आठही मंडळांत विम्याची २५ टके अग्रीम रक्कम मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांनी परिपत्रक काढून जाहीर केले . तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते . याची दखल घेत शेतकऱ्यांना अग्रीम विमा मंजूर करण्यात आला पण उर्वरित ७५ टक्के च्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत . पावसात पडलेल्या जास्तीच्या खंडामुळे व अतीपावसामुळे पिकांचे ६५ % पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पाहणीत सिध्द झाले होते . त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला २५ % पिकविम्याची अग्रणी रक्कम मंजूर करून वाटप करण्याचे आदेश दिले आहेत . मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद , बान्हाळी , मुखेड , जांब , येवती , अंबुलगा , जाहुर , चांडोळा या सर्वच आठही मंडळांचा अग्रीम २५ % विमा मंजूर झाली पण शिल्लक असलेला ७५ %
पिकविमा देखील उत्पादकतेनुसार मंजूर झाला पाहिजे . कारण तालुक्यातील पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे , असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी शेतकऱ्याची बाजू मांडली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here