Home बुलढाणा अवैध रेती तस्करी बिनबोभाट सुरू… प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अवैध रेती तस्करी बिनबोभाट सुरू… प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

98
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0017.jpg

अवैध रेती तस्करी बिनबोभाट सुरू… प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख सह
विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील

संग्रामपुर :- तालुक्यातील “वाणनदी पात्रातील अवैद्य रेतीची” अक्षरश: चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधलेले आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर-चोर भाऊ भाऊ वाटून खाऊ या संकल्पेतुन रेती तस्करी कारभार चालला असून लाखो रुपयांच्या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती हा संशोधनाचा विषय आहे.
सर्रास रेतीची वाहतूक चालू असून रेती तस्करीला उतआल्याचे निदर्शास येत आहे.प्रशासनाची करडी नजर असतांना देखील रेती तस्करी कशी काय चालते हा प्रश्न जनसामान्यांना पडत असून कुठे यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी बुडतो लाखोंचा महसूल
अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर चालत असून सुध्दा याकडे लक्ष का दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या पोटी दुर्लक्ष करतात की इतर काही. मात्र दरवर्षी लाखोंचा महसूल बुडत असताना देखील असे का होते हा प्रश्न निर्माण होत आहे. वळगाववाण, काटोल कोलद, काकणवाडा , रिंगणवाडी व वानखेड.या गावाजवळून वाहत असलेल्या वाणनदी पात्रातून तसेच तालुक्यातील इतरत्र नदी नाल्यातून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अवैध रेती तस्करी करिता जेसीबीच्या साहाय्याने अवैध रेती वाहतूक केली जात आहे. याची कल्पना प्रशासनाला नाही का..?
अनधिकृत रेती उत्खनन करण्यास बंदी असताना संग्रामपुर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा केला जात आहे. यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. रेती उपसा करणाऱ्यांवर दिखाऊ कारवाई केल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात रेती उत्खनन सुरूच आहे.
रेती उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने न्यायालयाने रेती उत्खननावर कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र न्यायालयाचे आदेश धुडकावून आजही अनेक ठिकाणी मनमानी व रेती तस्करांकडून दादागिरीने तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांसोबत चिरीमिरी करून रेती उपसा केला जातो. अनेकदा पर्यावरणप्रेमी व समाजसेवकांनी दिलेल्या तक्रारी अनेक वृत्तपत्रातून सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु प्रशासन मात्र ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
अवश्य वाचा – अधिका-यांना का जमत नाही.. रोजच वरील प्रत्येक गावात 20 ते 25 ट्रॅक्टर द्वारे अवैध रेती तस्करी सुरू असते. वाण नदी पात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती उपसा करून मोठ्या प्रमाणात गावालगत रेती साठा जमा केल्या जातो. आणि अकोला जिल्ह्यातील मोठमोठे हायवा ट्रक द्वारे अवैध स्टॉक केलेल्या रेतीचा उचल होतो मग वान नदीपात्राचा कुठल्याही प्रकारे लिलाव झालेला नसतांना देखील बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना सुद्धा संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांचेच पाठबळ आहे कारण एखाद्या सुज्ञ नागरिकांनी जर रेतीमाफीयाची माहिती दिली तर संबंधित अधिकारी मात्र त्या माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव सांगून रेती माफियांकडून त्यास नुकसान पोहोचवण्याचा संगनमताने प्रयत्न करतात असे दिसून येते. कारण काही महसूल अधिकारी हे रेतिमाफियांसोबतच फिरताना दिसतात. त्यामुळे एखाद्या वेळेस तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी संग्रामपुर तालुक्याकडे वेळीच लक्ष दिल्यास रेती माफियांकडून तालुक्यात भरधाव वेगाने विना नंबर वाहनाने चालू असलेली रेती तस्करीच्या वाहनाने एखादी दुर्घटना सुद्धा होण्यापासून थांबू शकते त्याकरिता वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
सर्रास रेती तस्करी होत असली तरी अधिकारी मात्र रेती भरलेले ट्रॅक्टर व वाण नदीतुन बाहेर जिल्ह्यात जानारे टिप्पर पकडण्यात संबंधित महसूल चे भरारी पथक मात्र “डोळे असून आंधळे” असल्यामुळे कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Previous articleभऊरच्या महाराष्ट्र बँकेत सफाई कर्मचाऱ्यांने मारला दिड कोटीवर हात! बतीस खातेदारांच्या खात्यावरील पैसे केले गायब!!
Next articleसंततधार पावसामुळे बेटमोगरा येथील मन्याड नदीस पाण्याच्या पातळीत वाढ होऊन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here