Home गुन्हेगारी भऊरच्या महाराष्ट्र बँकेत सफाई कर्मचाऱ्यांने मारला दिड कोटीवर हात! बतीस खातेदारांच्या खात्यावरील...

भऊरच्या महाराष्ट्र बँकेत सफाई कर्मचाऱ्यांने मारला दिड कोटीवर हात! बतीस खातेदारांच्या खात्यावरील पैसे केले गायब!!

67
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220713-163406_Google.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यानेच बँकेतील बत्तीस खातेदारांच्या ठेवींवर डल्ला मारत १ कोटी, ५० लाख ,७३ हजार ,४५० रुपये हडप केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,भऊर ता.देवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील बँक ग्राकांच्या खात्यावरील पैसे येथील रोजंदारी सफाई कर्मचारी भगवान ज्ञानदेव आहेर र.लोहोणेर ता.देवळा याने हडप केल्याचे उघडकीस आले आहे . सदर कर्मचारी हा सन २०१६ पासून बँकेत रोजंदारीवर कार्यरत होता .त्यामुळे त्याने खातेदारांना विश्वासात घेत त्यांच्याकडून पीक कर्जाचे पैसे घेत ते बँकेत जमा न करता व बचत खात्याची रक्कम देखील खातेदारांच्या खात्यात जमा न करता बँकेच्या सही शिक्का असलेल्या स्वहस्तलिखित पेनाने मुदत ठेवींच्या पावत्या बनावट तयार करून सदरच्या रकमा बँकेत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्या गेल्याचा प्रकार समोर आला आहे.तसेच बँकेतील मुदत ठेवींच्या सत्तावीस पावत्या सुध्दा चोरीस गेल्या आहेत याप्रकरणी बँकेचे मालेगाव येथील क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सदरहू आरोपी विरोधात देवळा पोलीस ठाण्यात अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे भा. द.वि. कलम 420,467,468,,406,408,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांचेसह पोलीस हवालदार निलेश सावकार,सचिन भामरे आदी करीत आहेत. दरम्यान सदरहू आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान झालेला प्रकार अतिशय गंभीर असून सदर प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे

Previous article!! आज गुरुपौर्णिमा !!
Next articleअवैध रेती तस्करी बिनबोभाट सुरू… प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here