Home नांदेड गणेश विसर्जनाला DJ मुक्त करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा.-सा.पो.निरीक्षक मा.भालचंद्र तिडके

गणेश विसर्जनाला DJ मुक्त करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा.-सा.पो.निरीक्षक मा.भालचंद्र तिडके

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0079.jpg

गणेश विसर्जनाला DJ मुक्त करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा.-सा.पो.निरीक्षक मा.भालचंद्र तिडके

मुक्रमाबाद/ बसव्वप्पा वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस स्टेशन हद्दीत १३१ श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागात ११६ तर शहरी भागात १५ श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. १०९ गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने श्री गणेशाचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

सर्वच गणेश मंडळांनी शांततेत व भक्तिमय वातावरणात गणेश उत्सव साजरा करावा. सामाजिक हितावह धार्मिक कार्यक्रम गणेश मंडळांनी घ्यावेत. त्यात रक्तदान शिबिर व इतर सामाजिक सलोखा जोपासणारे कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव

अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा. विसर्जन मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा गुलाल उधळण न करता पुष्पांची उधळण करावी व DJ मुक्त विसर्जन मिरवणूक साजरी करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा. गणेश उत्सव साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी व कायदा अबाधित राहील असाच गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करून गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे असे आव्हान मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके आणि गोपनीय शाखेचे मरगिलवार यांनी केले आहे.

Previous articleखेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाचे विसर्जन-
Next articleगौरी गणपती समोर हिमालयाचा अनोखा देखावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here