Home पुणे युवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”

युवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”

141
0

आशाताई बच्छाव

IMG-20230603-WA0028.jpg

नमस्कार मित्रांनो मी प्रशांत नागणे पुणे जिल्हा ब्युरो चीफ मित्रांनो पत्रकार म्हणून आपले मत जनतेसमोर मांडण्याची संधी दैनिक युवा मराठा न्यूज चे मुख्य संपादक श्री राजेंद्र राऊत पाटील यांनी दिल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो जीवन जगत असताना समाजामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत आणि यामध्ये अनेक ठिकाणी अनेक घडामोडी घडत असतात काही घडामोडी ह्या जनतेच्या कल्याणासाठी असतात आणि काही घडामोडी ह्या जनतेवर अन्याय म्हणून घडत असतात परंतु भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून जगत असताना फक्त स्वतःसाठी जगणे याला जीवन म्हणत नाही मित्रांनो स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो त्यासाठी समाजामध्ये राहून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशी अतूट इच्छा पहिल्यापासून होती ज्या ठिकाणी अन्याय घडतोय हे आपल्याला दिसत असतानाही आपण काहीतरी यावरती केलं पाहिजे असं खूप दिवसापासून वाटत होते त्याला कायद्याने विरोध केला पाहिजे परंतु मित्रांनो आजपर्यंत असा कुठलाही पाठिंबा माझ्या पाठीमागे नसल्यामुळे मला समोर अन्याय होतोय हे दिसत असतानाही मी काहीही करू शकलो नाही हे दुर्दैवी आहे परंतु जीवन जगत असताना मित्रांनो जर आपण संधीच्या शोधामध्ये असेल तर ईश्वर आपल्याला संधी नक्की देतो कारण चांगल्या माणसांमध्ये आणि चांगल्या कामांमध्ये ईश्वर दडलेला आहे हे खरे आहे दैनंदिन जीवन जगत असताना मला युवा मराठा न्यूज ची माहिती समजली ती समजल्यानंतर एकच विचार केला जनतेच्या प्रश्नावरती जर आपल्या हातून काहीतरी चांगले घडत असेल तर आपण युवा मराठा चे साथ देण गरजेचे आहे. आणि मित्रांनो, या संघटने सोबत सामील होऊन काम करण्याचे ठरवले सुरुवातीला मला पाटील साहेबांनी दौंड तालुका प्रतिनिधी पद दिले ते पद सांभाळत असताना अनेक गाव पातळी वरील अन्याय विरोधातील बातम्या माझ्या कडून लागल्या गेल्या अनेक गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना छोट्या छोट्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी युवा मराठा न्यूज च्या माध्यमातून केला मित्रांनो यामध्ये खूप मोठे समाधान मला मिळाले. माझी कामाची पद्धत पाहून पाटील साहेबांनी “राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ” पुणे जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड केली ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आणि आश्चर्यजनक गोष्ट होती. कारण युवा मराठा चे काम करत असताना वेगळीच जबाबदारी पाटील साहेबांनी माझ्यावर टाकली होती हे जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून बऱ्याच कामांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला, या संघटनेच्या माध्यमातून डिपार्टमेंट असो कलेक्टर ऑफिस, असो एस पी ऑफीस, असो ज्या गरीब जनतेचे छोटी छोटी कामे आडली गेलेली आहेत त्यांच्यासोबत उभे राहून युवा मराठा न्यूज आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्यामध्ये मला यश मिळाले, मित्रांनो युवा मराठा न्यूज एक वेगळंच स्टेटस मार्केटमध्ये तयार केले गेले जे लोक आत्तापर्यंत मान सन्मान देत नव्हते, आज एक रिपोर्टर आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मोठ्या आपुलकीने आणि सन्मानाने कुठल्याही प्रोग्रॅमला बोलवत आहेत, मित्रांनो, युवा मराठा न्यूज मध्ये काम करत असताना गेली दोन वर्षापासून कोणत्याही अमिषाला बळी न पडता जिथे जिथे अन्याय घडतोय त्याच्या विरोधामध्ये काम करण्याचे बळ युवा मराठा न्यूज च्या माध्यमातून आले हे करत असताना प्रत्येक पावलोपावली श्री राजेंद्र पाटील साहेबांचा सपोर्ट खूप मोठ्या लेवलला कामी आलेला आहे एकही रुपयाचा फायदा नसताना फक्त समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतंय म्हणून सोशल ऍक्टिव्हिटी आज दोन वर्षे मी स्वतः करतोय आणि त्याचे समाधान खूप मोठे आहे त्यानंतर गेली चार महिन्यांपूर्वी माझे रोजच्या बातम्या देण्याची पद्धत एखाद्या ठिकाणी अडचण आली तर खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहून त्याला त्यातून बाहेर काढण्याची पद्धत पाहून राजेंद्र पाटील साहेबांनी अजून एक जबाबदारी माझ्यावरती सोपवली ती म्हणजे दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ पद मला देण्यात आले त्यासाठी मी सरांचा खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे त्यांनी मला त्या लायक समजले मित्रांनो, रोजचे जीवन जगत असताना ‘युवा मराठा ब्युरो चीफ’ म्हणून काम करत असताना रस्त्यावर जाताना कोणतीही दुर्घटना घडलेली दिसली त्या ठिकाणी जाऊन वाद लागले असतील, तर ते मिटवणे किंवा एक्सीडेंट झाला असेल तर पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला डिपार्टमेंट येण्याआधी ट्रीटमेंट चालू करायला लावणे, आणि न्यूजच्या माध्यमातून पेशंटचा खर्च कमी कसा होईल या बारीकसारीक सामाजिक गोष्टी माझ्या हातून घडत चालल्या आहेत मित्रांनो माझी मुलगी ‘आय सी ओ’ मध्ये असताना विश्वराज हॉस्पिटल चे मालक डॉक्टर आदिती कराड यांना मी युवा मराठा न्यूज मध्ये काम करत आहे. असे सांगून समाजासाठी आम्ही काय काय करत आहोत हे सांगितल्यानंतर त्यांनी बिलामध्ये माणुसकी दाखवून बिल कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आधार ठरला गेला मित्रांनो युवा मराठा न्यूज हे खूप मोठे जाळ आहे आपल्याला याला दिवसेंदिवस वाढवायचे आहे कारण एक वेगळच स्टेटस यामुळे आपल्या प्रत्येकालाा मिळणार आहे कोणत्याही मंदिरामध्ये जर आपण गेलो तर व्हीआयपी ट्रीटमेंट आपल्याला मिळते हे फक्त युवा मराठा न्यूजनेत साध्य केले मित्रांनो भारतामध्ये अनेक चॅनेल्स काम करतात परंतु अनेक पत्रकार लाच घेऊन भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करतात परंतु युवा मराठा न्यूज चे वैशिष्ट्य आहे अन्याय ज्या ठिकाणी घडेल त्या ठिकाणी अन्याविरुद्ध वाचा फोडणे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न्न करणे कुणाचीही लाज न स्वीकारता काम करण्याचा अनुभव युवा मराठा न्यूज मध्ये आतापर्यंत आला कारण अनेक पत्रकारांनी लाज घेऊन पत्रकारिता बदनाम केलेली आहे परंतु आपण सर्वजण पाहू शकता जर आपणही हा मार्ग अवलंबिला असता तर आपले जे मुख्य संपादक आहेत आज युवा मराठा साठी देणगी गोळा करण्याची वेळ आली नसती परंतु माझ्या मताप्रमाणे मला याचा अभिमान आहे आपले मुख्य संपादक आणि युवा मराठा न्यूज ची टीम निस्वार्थपणे समाजासाठी आणि आपणासाठी काम करत असते कुणाच्याही भ्रष्टाचाराला आतापर्यंत ते बळी पडलेले नाहीत म्हणून प्रत्येक पत्रकाराला माझे सांगणे आहे ज्या ज्या ठिकाणी युवा मराठा न्यूज ला गरज पडेल त्या त्या ठिकाणी स्वतःची फॅमिली समजून फुल ना फुलाची पाकळी मदत करतत रहावे बाकी खर्च तर आपण कोठेही करतो परंतु या ठिकाणचा खर्च तुमचा वाया जाणार नाही कारण प्रत्येक संकटामध्ये पाटील साहेब आपल्यासोबत खंबीरपणे उभेे असतात. भलेही आज ते पैशांमध्ये मागे असतील परंतु पत्रकारिते मधले त्यांचं नॉलेज कायद्याचे नॉलेज त्यांच्याकडे भरमसाठ प्रमाणात आहे. आणि यदाकदाचित उद्या आपण कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये जर सापडलो, तर त्यांच्या नॉलेजच्या जीवावरती लाखो रुपये तुमचे वाचूू शकतात याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मदत करावा असं माझं मत आहे मित्रांनो जाता जाता एकच सांगेल युवा मराठा न्यूज हे खूप मोठे नाव आहे. याचा बोलबाला येणाऱ्या काळात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे सर्व शक्य होणार आहेत. तुम्हा आमच्या प्रयत्नाने मित्रांनो बोलण्यासारखे खूप आहे, फक्त एकच सांगेल युवा मराठा मध्ये दाखल झाल्यापासून एवढी ताकद तयार झाली आहे कोठेही अन्याय घडत असेल कोणताही विचार न करता त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली जाते ही ताकद आहे. युवा मराठा न्यूज चे पुनश्च एकदा आपले मुख्य संपादक श्री राजेंद्र राऊत पाटील यांचा मनःपूर्वक आभारी आहे. “हाथियार और औजार अपने पास रखे जनाब, हम तो ओ जमात है जो खंजर नाही कलम से चोट करते है “! आपलाच विश्वासू पुणे जिल्हा ब्युरो चीप श्री प्रशांत नागणे

Previous articleमनपा शिक्षणधिकारी अन् लिपिक ACBच्या जाळ्यात; ५० हजाराची लाच घेताना अटक
Next articleज्ञानराज पब्लिक स्कूल एस एस सी चा 100% निकाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here