Home जालना समृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :  

समृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :  

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0046.jpg

समृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :
सोनाली कुलकर्णी, मीरा जोशी  यांच्या नृत्याविष्काराने रसिक घायाळ  
महाप्रसाद वाटपानंतर समृद्धी गणेश मंडळाचा गणरायाला निरोप 
 
घनसावंगी/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-:समृद्धी साखर कारखान्यात समृद्धी शुगर्स गणेश मंडळाच्यावतीने आयोजित  समृद्धी फेस्टिवल -२०२३ चा शेवटचा भव्य  सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार ठरला. या कार्यक्रमास घनसावंगी मतदारसंघातील रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला.  गुरुवारी सकाळी ११ वाजता  महाप्रसाद वाटपानंतर समृद्धी गणेश मंडळाच्या वतीने  ‘श्री’ च्या मूर्तीचे  विसर्जन करण्यात आले.

समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी पासून आयोजित करण्यात येत असलेल्या समृद्धी फेस्टिवलला यावर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या फेस्टिवलध्ये आयोजित  सांस्कृतिक कार्यक्रमास मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी  प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांच्या यांच्या धडाकेबाज कार्यक्रमाने  समृद्धी फेस्टिवलच्या उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिनेत्री मानसी नाईक यांनी हटके अंदाजात सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची दाद मिळाली. या फेस्टिवलमधील अभिनेत्री मीरा जोशी व सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम अतिशय रंगतदार ठरला. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक आले होते. दोन्ही अभिनेत्रींनी सादर केलेल्या नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.  तर गायक शैलेश निसरगंध व विद्या पवार या जोडीने संपूर्ण फेस्टिवल मध्ये सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना संगीताच्या तालावर ठेका धरायला भाग पाडले.

Previous articleसाहेब आम्ही आता तुमची साथ कधीच सोडणार नाही   कुरण येथील शेतकरी, युवकांचा सतीश घाटगेंना पाठींबा  
Next articleसमृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here