Home विदर्भ एसटी कर्मचाऱ्यांना कटिंग व दाढी मोफत, साई हेअर सलून

एसटी कर्मचाऱ्यांना कटिंग व दाढी मोफत, साई हेअर सलून

376
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांना कटिंग व दाढी मोफत, साई हेअर सलून

मंगरुळपीर,(रितेश गाडेकर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- अनसिंग येथील साई हेअर सलून चे मालक आबा सोनटक्के यांनी जेवढे एस.टी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मोफत दाढी व कटिंग ही योजना सुरु केली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत या योजनेचा कालावधी आहे ही योजना सुरू करण्याचे कारण मागील काही दिवसापासून एसटी संप सुरू आहे आणि त्यातच अनेक दिवसापासून एसटी संप चालू असल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसापासून संप पुकारला आहे. राज्यातल्या 250 पैकी 225 आगारांमधले कर्मचारी संपावर गेल्यानं बहुतांश ठिकाणची एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.प्रमुख मागण्याराज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विलीनीकरण करावं यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगारवाढ अशा चार प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. 28 ऑक्‍टोबर रोजी युनियन नेत्यांच्या कृती समितीने परब यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यात विलीनीकरणाचा मुद्दा वगळता इतर तिन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आणि बैठकीत युनियन नेत्यांनी संप मागे घेण्याचं मान्य केलं; मात्र कर्मचाऱ्यांच्या काही गटांनी काम सुरू करण्यास नकार दिला. 25 ऑक्टोबर रोजी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ करून तो 12 टक्क्यांवरून 17 टक्के केला होता; मात्र तो 28 टक्के करावा अशी मागणी करत 27 ऑक्टोबरला आंदोलन करण्यात आलं होत. विलीनीकरणाची मुख्य मागणी मान्य न झाल्याने कर्मचारी संतप्त आणि नाराज झाले आणि त्यांनी संप सुरूच ठेवला.कर्मचाऱ्यांचा मागण्या पूर्ण करा असे जनतेच्या बोलण्यावरून लक्षात येते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here