Home विदर्भ एमआयडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करावी ! स्लग-एमआयडीसी कामगार हक्क समितीची मागणी...

एमआयडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करावी ! स्लग-एमआयडीसी कामगार हक्क समितीची मागणी अकोला : एमआईडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करावी अशी मागणी

205
0

राजेंद्र पाटील राऊत

एमआयडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करावी !
स्लग-एमआयडीसी कामगार हक्क समितीची मागणी

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : एमआईडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करावी अशी मागणी
एमआयडीसी कामगार हक्क समितीने केली आहे.
एमआयडीसी कामगार हक्क समिती अकोला यांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समितीचे अध्यक्ष अध्यक्ष निलेश खडसान यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने निवेदन देताना कामगारांच्या समस्या मांडून
एमआयडीसी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवारी करण्यात यावी अशी विनंती केली.
आपल्या एम. आय. डी. सी मध्ये मागील कित्येक वर्षापासून साप्ताहिक सुट्टी
सोमवार होता, परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे बदलवुन रविवार करण्यात आला. त्यामुळे रविवार हा शासकिय सुट्टीचा दिवस असल्याकारणाने सर्व शासकीय ऑफीस व बँकासुध्दा रविवारी बंद असतात. त्यामुळे कामगारांचे कोणत्याही प्रकारचे काम होत नसुन सर्व शासकिय ऑफीस व बँकेचे काम असल्यास कामगारांना सुट्टी काढुन करावे लागते. त्यामुळे त्यांची त्या दिवशीची आर्थिक नुकसान होते त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर पडतो. करीता कामगारांच्या अडचणी व भावना समजुन एम.आय.डी.सी. मधील साप्ताहिक सुट्टी सोमवार करावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली ‌
निवेदन देताना एमआयडीसी कामगार हक्क समितीचे अध्यक्ष निलेश खडसान, पदाधिकारी नितीन राऊत, दिनेश लोडम, दिलीप कुकडे, विपुल वानखडे, गणेश धनभर पदाधिकारी व कामगारांची उपस्थित होते
————

Previous articleनारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना कटिंग व दाढी मोफत, साई हेअर सलून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here