Home रत्नागिरी अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशनमध्ये एज्युकेयर फाउंडेशन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशनमध्ये एज्युकेयर फाउंडेशन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0049.jpg

अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशनमध्ये एज्युकेयर फाउंडेशन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश                         रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रोॲक्टिव्ह अबॅकस या राष्ट्रीय कंपनीतर्फे नॅशनल समर कॉम्पिटिशन नुकतीच कोल्हापुर येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह अन्य ४ राज्यातून १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

६ मिनिटामध्ये १०० अचूक गणिते अबॅकसवर सोडविणे, या स्पर्धेत रत्नागिरी येथील एज्युकेयर फाउंडेशन सेंटरच्या १२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला पैकी ५ विद्यार्थ्यांनी विविध गटात नॅशनल लेव्हलची ट्रॉफी जिंकून घवघवीत यश संपादन केले. यात कु. गौरी दीपक बडगुजर (इ.8 वी) हीने 1D लेव्हल-1 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 6 मिनिटात 70 पैकी 68 अचूक गणिते सोडवत प्रथम क्रमांकाची विनर ठरली आहे.

तर 1B लेव्हल -1 (इ.5वी) मध्ये कु. चिन्मय दीपक बडगुजर याने 3rd रँक व कु. दुर्वेश दिपक बडगुजर याने 4th रँकची ट्रॉफी मिळवली. 1A-लेव्हल 1 मधील इ. पहिलीच्या गटात कु. अनुप धनंजय केतकर व इ. दुसरीच्या गटात कु. गार्गी मंदार देवल या दोघांनीही 3rd रँकची ट्रॉफी मिळवली.

या बरोबरच कु. मिहीर महेंद्र जाधव, कु. मानस निनाद गांगण, कु. अभिज्ञ चेतन कांबळे, कु. गीता रविंद्र गायकवाड, कु. मनस्वी महेश साळवी, कु. सिद्धार्थ गिरीष पिंगळे, कु. स्वरूप प्रदीप गडदे यांनी या स्पर्धेत उत्तम कामगीरी करत उत्तेजनार्थ परितोषिक मिळविले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १६ ऑगस्ट रोजी साळवी स्टॉप येथे पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. या कार्यक्रमात ट्रॉफी व प्रमाणपत्र टॅक्स कन्सलटंट व भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरीचे समिती सदस्य श्री. धनेश रायकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी एज्युकेयर फाउंडेशनचे संचालक श्री. स्वप्निल सावंत हे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या प्रमुख सौ. सोनल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांच्या शाळा व पालक वर्गातून होत आहे.

Previous articleसंगमेश्वर साखरपा येथे रंगणार शक्ती – तुऱ्याचा जंगी महामुकाबला
Next articleजलसंधारण महामंडळाच्या आकांक्षीत योजनेतील ७२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here