Home जालना साहेब आम्ही आता तुमची साथ कधीच सोडणार नाही   कुरण येथील शेतकरी,...

साहेब आम्ही आता तुमची साथ कधीच सोडणार नाही   कुरण येथील शेतकरी, युवकांचा सतीश घाटगेंना पाठींबा  

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0050.jpg

साहेब आम्ही आता तुमची साथ कधीच सोडणार नाही
कुरण येथील शेतकरी, युवकांचा सतीश घाटगेंना पाठींबा
गावच्या विकासाठी भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश  
अंबड/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-:तालुक्यातील कुरण गावातील शेतकरी व युवकांनी  भाजप नेते  सतीश घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. याप्रसंगी सर्व शेतकरी व युवकांचा सत्कार करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कुरण गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या राजकारणाचा मोठा त्रास सहन करावा लागला. येथील  शेतकरी, कष्टकरी वर्गाला गृहीत धरल्या जाते.  मात्र समृद्धी कारखान्यामुळे शेतकरी भितीमुक्त होत असल्याचे आम्ही तुमच्या नेतृत्वाचा स्वीकार करत असून, तुमची साथ सोडणार नसल्याचे  यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. सतीश घाटगे यांनी कुरण गावच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा शब्द यावेळी दिला. रामेश्वर पवार, अनिल मापारी, संभाजी पवार, राजेंद्र सोलंकर, बाळासाहेब सोलंकर, शंकराव पवार, बाळासाहेब कुरणकर, राजेंद्र सोलंकर ,रामेश्वर धापसे, कल्याणराव राक्षे, संतोष राक्षे, संभाजी पवार, विठ्ठल वाव्हुल,  तात्यासाहेब राक्षे, अशोक कुऱ्हे, गणपत मदने, भगवान थोरात, ब्रह्मा मगरे, अविनाश थोरात, राम कुऱ्हे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Previous articleतालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चांदवड येथील श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
Next articleसमृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here