Home नाशिक तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चांदवड येथील श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांची चमकदार...

तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चांदवड येथील श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

108
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-075935_WhatsApp.jpg

तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चांदवड येथील श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

३००० मीटर धावणे स्पर्धेत रोशन वाघ प्रथम

दैनिक युवा मराठा
चांदवड प्रतिनिधी–लक्ष्मण आवारे

२६ व २७ सप्टेंबर रोजी जनता विद्यालय काजी सांगवी येथे म.वि.प्र.सेवक संचालक व तालुका क्रीडा संचालक जगन्नाथ निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय विविध मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये श्रीमती जे.आर गुंजाळ, माध्य व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सतरा वर्ष वयोगटातील ३००० मीटर धावणे स्पर्धेत रोशन जयराम वाघ या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक संपादन केला तर ऋतुजा संदीप गायकवाड या विद्यार्थिनींने तृतीय क्रमांक संपादन केला. ८०० मीटर धावणे क्रीडा स्पर्धेत जयेश केदा पवार या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ४०० मीटर धावणे क्रीडा स्पर्धेत पूजा राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला. थाळीफेक स्पर्धेत सचिन संतोष पवार या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. लांब उडी स्पर्धेत पूजा राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. उंच उडी स्पर्धेत अजय मोगल माळी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला. हातोडा फेक क्रीडा स्पर्धेत सिद्धेश श्रीहरी ठाकरे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळविला. तीन किलोमीटर चालणे या स्पर्धेत वैष्णवी देवीदास उगले या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विभाग स्तरावरील पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटात समीर ठमके या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन भाऊ ठाकरे, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर , विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक प्रकाश आहेर उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख कुरणे सर प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले. या विदयार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleआत्मा मालिक गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांची विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड–
Next articleसाहेब आम्ही आता तुमची साथ कधीच सोडणार नाही   कुरण येथील शेतकरी, युवकांचा सतीश घाटगेंना पाठींबा  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here