• Home
  • खासदार सुप्रिया सुळे आणि डाँ. अमोल कोल्हे यांच्या विषयी महत्वाची बातमी 

खासदार सुप्रिया सुळे आणि डाँ. अमोल कोल्हे यांच्या विषयी महत्वाची बातमी 

खासदार सुप्रिया सुळे आणि डाँ. अमोल कोल्हे यांच्या विषयी महत्वाची बातमी⭕

पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : ” कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे दोन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया वापरून वारंवार जनजागृती करताना दिसले.

या दोन्ही खासदारांनी वेळोवेळी आपल्या मतदार संघाबरोबर म्हणजे सुळे यांचा बारामती व कोल्हे यांचा शिरूर या मतदार संघात त्यांनी जनजागृती तर केलीच, परंतू महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी या दोघांनी संवाद साधून जागृती केली.

या देन्ही खासदारांनी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत काेरोनाविषयी जागृती केली.

त्याचप्रमाणे या दोन्ही खासदारांनी शासकीय यंत्रणांमार्फत महाराष्ट्रातील जे नागरिक इतर राज्यांमध्ये अडकले होते त्यांना महाराष्ट्रात आणण्याचे काम केले. त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाचा वापर करत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर करत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याविषयी जागृती केली. तसेच नागरिकांनी आधार देत इतरही मदतीचा हात दिला.

हे दोनही खासदार मोठ्या प्रमाणावर गरजूंना मदत करत असून या संकटकाळात खूपच चांगले कार्य करत आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. “

anews Banner

Leave A Comment