Home अमरावती गो. सी. टोम्पे महाविद्यालयात “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन”

गो. सी. टोम्पे महाविद्यालयात “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन”

47
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-064020_WhatsApp.jpg

गो. सी. टोम्पे महाविद्यालयात “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन”
मयुर खापरे चादुंर बाजार. –
गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि रोजगार मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन संत नामदेव सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाराष्ट्र राज्य यांनी युवकांचा सर्वांगीण विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या “करिअर कट्टा” या उपक्रमाबाबत माहिती दिली. विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्वाचा कालखंड म्हणजे त्यांचा महाविद्यालयातील विविध उपक्रमातील सहभाग तसेच एक यशस्वी व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी अभ्यासाबरोबर दिलेला वेळ. आजच्या या सामाजिक माध्यमांच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच त्यांची योग्य सांगड घालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. नियोजनबद्ध आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो त्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडेल व जीवन संस्कारांनी समृद्ध होईल. विद्यार्थ्यांनी जीवनात “ ए ” आणि “ बी “ प्लान तयार ठेवूनच पुढे वाटचाल करावी व योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नरत राहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयीन समन्वयक डॉ. उमेश कनेरकर यांनी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असून गरज असल्यास आवश्यक मदत सुद्धा केली जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सदस्य डॉ. धनंजय बिजवे यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न
Next articleककाणीत युवा प्रतिष्ठाण कडून दुर्गा देवीची उत्साहात सांगता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here