Home नाशिक देवरगावला योगीराज हरे कृष्ण विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

देवरगावला योगीराज हरे कृष्ण विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_071654.jpg

देवरगावला योगीराज हरे कृष्ण विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

म.वि.प्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व योगीराज हरेकृष्ण बाबा विद्यालय देवरगाव तालुका चांदवड विद्यालयाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 1 मार्च 2024 पासून सुरू होणा-या एस.एस.सी.परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दिलीप शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून तुषार कुरणे,विठ्ठल वारुळे ,सागर शिंदे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप सावंत उपस्थित होते.प्रथम विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय पंतप्रधान समीक्षा शिंदे, ओम जाधव,ऋतुराज शिंदे ,रोहिणी पवार,अंजली गोसावी,शंतनु देसाई,कावेरी शिंदे, ओंकार शिंदे,धनश्री शिंदे, संजोती सोनवणे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अंजली गोसावी व ओम जाधव या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनावर गायलेल्या कवितांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.शिक्षकाच्या वतीने श्यामराव पगार, निर्मला खांगळ ,संगीता गांगुर्डे, बाळकृष्ण महाले, तात्यासाहेब बोरसे,नवल देवरे यांनी आपले मनोगत मांडले. मुख्याध्यापक दिलीप सावंत सर यांनी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.. अध्यक्षीय मनोगतात डॉ दिलीप शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मौलिक संदेश दिला नंतर अल्पोपहार आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी शिंदे हिने तर आभार संज्योती सोनवणे हिने केले.कार्यक्रमास दत्तु ठोंबरे, वेणुनाथ गायकवाड, मनीषा देवरे,तुषार कोर, नितीन बोरसे,महेश घोरपडे , जाधव, माणिक शिंदे,राहुल दाते,गोविंद डुकरे, दीपक जेऊघाले उपस्थित होते.

Previous articleनिमगाव (पहेला )येथे देवस्थान पंच कमिटी व ग्रामवासी यांच्या वतीने घटस्थापना व गोपालकाला कार्यक्रम संपन्न
Next articleअंबाजोगाईतील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here