Home जालना समृद्धीने दूर केली  मासेगांवची पाणी टंचाई सतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत...

समृद्धीने दूर केली  मासेगांवची पाणी टंचाई सतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत  टँकर

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_203237.jpg

समृद्धीने दूर केली  मासेगांवची पाणी टंचाई

सतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत  टँकर
———-
घनसावंगी/जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील मासेगावच्या हजारो कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न समृद्धी साखर कारखान्याने सोडवला आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मोफत  टँकर सुरु करून गावाची तहान भागवली. याबद्दल मासेगांवच्या महिलांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
दुष्काळाने होरपळलेल्या घनसावंगी मतदारसंघातील टंचाईग्रस्त  गावांना समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यावतीने मोफत टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक गावांना  समृद्धीच्या टँकरने दिलासा दिला आहे. घनसावंगी तालुक्यातील मासेगांवातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. गंगाधर आनंदे यांनी  गावकऱ्यांच्या वतीने  त्यांना पाणी  टँकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शुक्रवारी  सतीश घाटगे यांनी  टँकर सुरु केले. समृध्दी कारखान्याच्या माध्यमातून टँकर सुरु करून पाण्यासाठी महिलांची होत असलेली हेळसांड थांबवल्याबद्दल  गावकऱ्यांनी समृद्धी कारखान्याचे आभार मानले. कारखान्यामार्फत मासेगावात आलेल्या पाण्याच्या टँकरचे रामायणाचार्य  लक्ष्मण महाराज आनंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सतीश आनंदे,चेअरमन प्रकाशराव आनंदे, सरपंच बाबुराव पुरी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल आनंदे,दत्ताभाऊ आनंदे, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव आनंदे, बापुराव घुमरे, ग्रां.प.सदस्य हनुमंत आनंदे, दामोधर आनंदे, महेश आनंदे, आसाराम आनंदे, दत्ताभाऊ शिंदे, आसाराम आनंदे, श्रीहरी आनंदे, कल्याण आनंदे, सिध्देश्वर आनंदे, एकनाथ आनंदे, सुनील कोळे, गणेश आनंदे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

Previous articleगजानन तौर हत्या प्रकरणांतील आरोपी विलास पवार उर्फ टायगर पोलिसांच्या ताब्यात
Next articleभाजपा जिल्हा कार्यालयात स्थापना दिवस उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here