Home जालना भाजपा जिल्हा कार्यालयात स्थापना दिवस उत्साहात साजरा

भाजपा जिल्हा कार्यालयात स्थापना दिवस उत्साहात साजरा

127

आशाताई बच्छाव

IMG_20240406_203609.jpg

 

भाजपा जिल्हा कार्यालयात स्थापना दिवस उत्साहात साजरा

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज दि.०६ एप्रिल २०२४ रोजी साजरा करण्यात आला, यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व भारत माता, श्यामा प्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फिर एक बार, मोदी सरकार, अबकी बार, 400 के पार, या आवाहना सोबत अथक परिश्रम करुन माननीय श्री. नरेन्द्र मोदी जी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प आम्ही आज या भाजपा स्थापना दिनानिमित्त घेतला.

यावेळी बोलताना भास्कर (आबा) दानवे म्हणाले की, आपणास माहित आहे की, ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. देशामधील सर्व कार्यकर्ता हर्षोल्लासामध्ये पार्टी स्थापनेचा दिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा करत असतात आणि पक्षाच्या विचारधारे प्रति संकल्पित होऊन कार्य करतात. माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतृत्वात सतत तिसऱ्यावेळी सरकार बनवण्यासाठी सर्व कार्यकर्ता आणि देशाच्या जनतेने निश्चितपणे मन बनविले आहेत. माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात गरीब, किसान, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, मागासवर्ग कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक कार्य करीत आहे, भारताच्या आधारभूत संरचनांमध्ये उल्लेखणीय प्रगती होत आहे. भारताचा मान-सन्मान, संस्कृती आणि एैतिहासिक धोरण यामध्ये अद्वितीय कार्य करत आहेत. देश विकसित करण्याचा भारताचा संकल्प साकार होताना दिसत आहे आणि पूर्ण देश मोदीमय होत आहे असे त्यांनी सांगितले व भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Previous articleसमृद्धीने दूर केली  मासेगांवची पाणी टंचाई सतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत  टँकर
Next articleआसई येथे दक्षिणमुखी हनुमान संस्थान ऐतीहासिक युद्धभूमी आसई नगरीत यात्रा महोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.